अखिल भारतीय छावा संघटना शेवटपर्यंत जरांगेंसोबत

- संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा जरांगेंना विश्वास

0

अखिल भारतीय छावा संघटना शेवटपर्यंत जरांगेंसोबत

– संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा जरांगेंना विश्वास

जालना : काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय छावा संघटना भाजपा सोबत असल्याचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न प्रवीण दरेकर यांनी केला होता. परंतु अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना ही मराठ्यांचे क्रांतीसूर्य आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या त्यागाने व बलिदानाने उभी राहिलेली मराठा समाजाची ज्वलंत चळवळ आहे. ही अशी कोणासोबत जाणार नाही, असे सांगत सर्व पदाधिकाऱ्यांसह मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना विश्वास दिला की, मराठा आरक्षणाच्या लढ्यात अखिल भारतीय छावा संघटना पहिल्या दिवसांपासून सोबत आहे व शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या सोबत असेल, असा विश्वास दिला.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांचे क्रांतीसुर्य वंदनीय आण्णासाहेब जावळे पाटील यांचे ज्वलंत विचार गावखेड्याचा कार्यकर्ता त्याच ताकदीने तेवत ठेवतोय याचा माझ्या सारख्या कार्यकत्यार्ला प्रचंड अभिमान आहे. तसेच आण्णासाहेबांच्या त्यागाबाबत बोलताना जरांगे पाटील भाऊक झाले व त्यांचा त्याग व बलिदान आपण विसरणार नसल्याचेही आवर्जून सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यसह मराठवाडा विभागीय पदाधीकारी सर्व जिल्हाप्रमुख व पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

मी प्रत्येक छाव्यासोबत

कोण कुठं जातय यांच्याशी मला काही देणं-घेणं नाही. परंतु आण्णासाहेबांचा विचार सुरु ठेवायचा म्हणून आपण राज्यभरातून येवढ्या संख्येने आलात याचा मला आनंद आहे. मी आण्णासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्यां प्रत्येक छाव्यांसोबत आहे, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.