महाश्रमदान संकल्पासाठी वृक्ष लागवड करा
-स्वामी शांतीगिरी महाराज यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : महाश्रमदान संकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवाराच्या प्रत्येक भक्ताने आपल्याच गावात मंदिर स्वच्छता, वृक्ष लागवडसह विविध प्रकारे श्रमदान करावे, असे प्रतिपादन श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांनी केले. ते गुरुपौर्णिमेनिमित्त वेरूळ येथील आयोजित सोहळ्यात बोलत होते.
महाश्रमदान संकल्पासाठी वृक्ष लागवड करा
मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन
आजचे बालक हे उद्याचे राष्ट्रचालक बनणार आहेत, असे शांतीगिरी महाराज म्हणाले. सुज्ञान संस्कारी पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनातून बालसंस्कार शिबिराचे दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजन केले जाते. यामध्ये दैनंदिन नियोजनाप्रमाणे पहाटे बाबाजी लिखित विधी, योगासने, प्राणायाम, भागवत कथा, बाबाजी व संतांचे मार्गदर्शन, सकाळचा फराळ, परिसर स्वच्छता, हस्तलिखित जप, ध्यानधारणा, तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारच्या सत्रात फराळ, दररोज विविध क्रीडाप्रकारातील नियोजनानुसार एक खेळ, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, सामान्यज्ञान परीक्षा, विधी परीक्षा तसेच गुरुकुलातील गुरुजनांचे विविध विषयांवर व्याख्यान झाले. गुरुपौर्णिमेनिमित्त बाल संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वेरूळ येथील हजारो बालके सहभागी झाली होती.
जायकवाडी धरणात 4.13 टक्के पाणीसाठा
गुन्हेगारी प्रवृत्तीला सीसीटीव्हीमुळे आळा बसेल मुंडे यांचे प्रतिपादन
पाद्यपूजनाने सोहळ्याची सांगता
पालखी मिरवणुकीसह पाद्यपूजनाचाही कार्यक्रम आठ दिवस चाललेल्या या सोहळ्याची सांगता निष्काम कर्मयोगी श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या भव्य पालखी मिरवणुकीसह पाद्यपूजनाने झाली. या वेळी भावसार ताई यांच्या वतीने स्वामी शांतीगिरी महाराज यांची सोनपापडी तुला करण्यात आली.