जरागेंच्या आडून शरद पवार उद्धव ठाकरेंचे राजकारण – राज ठाकरे

राज ठाकरे यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र

0

जरागेंच्या आडून शरद पवार उद्धव ठाकरेंचे राजकारण

राज ठाकरे यांचे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
जरागेंच्या आडून शरद पवार उद्धव ठाकरेंचे राजकारण: आपल्याकडे सध्या केवळ जातीचे राजकारण केले जाते. जातीच्या राजकारणातून जनतेची माथी भडकवली जात आहेत. मराठा आंदोलक मनोज जरागेंच्या आडून शरद पवार व उद्धव ठाकरे राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. ते शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते.

जरागेंच्या आडून शरद पवार उद्धव ठाकरेंचे राजकारण: राज ठाकरे यांच्या बीड दौऱ्यादरम्यान शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ठाकरेंच्या ताफयावर सुपारी फेकून सुपारीबाज चलो जावच्या घोषणा दिल्याने चांगलेच वातावरण तापले होते. यासंदर्भात राज ठाकरे म्हणाले की, बीडमध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाला आमच्या पोरांनी मार मार मारले. नशीब पोलिस मध्य पडले. यापुढे माझ्या नादी लागू नका, अन्यथा माझी पोरं तुमची गालं लाल करतील, असा इशारा राज ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.

मनोज जरांगेंच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करीत आहेत. यामध्ये काही पत्रकार हे सुद्धा राजकारण करत आहेत. यामध्ये कुणाला कंत्राट मिळाले, तर कुणी गाड्या घेतल्या. कुणाला भुखंड मिळाला, हे सर्व मला माहिती आहे. याची माहिती मी देणार असून त्यांची लवकरच चौकशी लावली जाईल्, असे राज ठाकरे म्हणाले. महायुतीमध्ये तिघांचा स्टेक आहे, चौथा पार्टनर घेणार कुठून असे म्हणत त्यांनी महायूतीमध्ये जाणार नाही, असे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या संदर्भात बोलताना संजय राऊत हे शरद पवारांची सोंगटी आणि करवली आहे, अशी टीका केली. तर पवारांच्या उंबरठ्यावर बसून ते आपले संपूर्ण आयुष्य झिजवणार आहेत. अजित पवार कधीच जातीय राजकारणात पडले नाही, म्हणत त्यांनी अजित पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केल्याचे दिसले.

आर्थिक निकषावर आरक्षण द्या

२००६ पासून आजपर्यंत माझी एकच भूमिका आहे, आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवे. अशी माझी भूमिका आहे, अशी असल्याचे भूमिका राज ठाकरे म्हणाल.े या महाराष्ट्रात जर पहिला विचार महाराष्ट्रातील मुलांचा विचार झाला तर आरक्षणाची गरज पडणार नाही, असे म्हणाले.

नेत्यांच्या गाड्या आडवू नका

मराठवाडा दौºयावर असलेल्या राज ठाकरेंना जागोजागी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोर जावे लागत आहे. आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांची गाडी आडवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज ठाकरेंचा ताफा मराठा आंदोलकांना आडवू नये, आपण मुंबईला जाऊ असेही जरांगे पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.