पूजा खेडकरला यूपीएससीचा दणका
-२०२३ बॅचच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पुजाची निवड रद्द
नवी दिल्ली : नागरी सेवांमध्ये निवडीसाठी ओळख बदलून अपंगत्व प्रमाणपत्रात अनियमितता केल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकर आता प्रशिक्षणार्थी आयएएस नाही. यूपीएससी ने पूजाची निवड रद्द केली आहे. यूपीएससी ने २०२३ बॅचच्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर विरुद्ध नागरी सेवा परीक्षेत ओळख बदलून विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा परिक्षा दिल्याबद्दल एफआयआर दाखल केला होता. यामध्ये अपंगत्व प्रमाणपत्रात पूजा खेडकर यांचा पत्ता प्लॉट नं. ५३, देहू आळंदी रोड, तळवडे, पिंपरी चिंचवड, पुणे असा लिहिला होता. तर या पत्त्यावर घर नसून थर्मोव्हर्टा इंजिनिअरिंग कंपनी नावाचा कारखाना आहे.
उंडणगावात आईच्या सन्मानासाठी वृक्षारोपण
नव्या संसद भवनच्या इमारतीला गळती
शहर स्वच्छ बनविण्यासाठी माझा कचरा माझी जबाबदारी मोहिम
यूपीएससी ने पूजाला नोटीस बजावली होती आणि निवड रद्द करण्याबाबत उत्तर मागितले होते. यामध्ये यूपीएससीने म्हटले होते की, पूजाविरुद्धच्या तपासात त्यांचे नाव, पालकांचे नाव, स्वाक्षरी, फोटो, ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि पत्ता बदलून यूपीएससीची परीक्षा दिल्याचे आढळून आले. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूजाविरुद्ध बनावटगिरी, फसवणूक, आयटी कायदा आणि अपंगत्व कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यामध्ये पूजावर पदाचा गैरवापर आणि प्रशिक्षणादरम्यान वाईट वर्तन केल्याचा आरोप होता. आधी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजाविरोधात तक्रार केली होती, त्यानंतर त्यांची वाशिमला बदली झाली होती.
पूजा खेडकरवर ओळख लपवून ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला. १६ जुलै रोजी पूजाचे प्रशिक्षण थांबवण्यात आले आणि त्यांना मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी आॅफ अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये परत बोलावण्यात आले. २३ जुलैच्या अंतिम मुदतीपर्यंत पुजा खेडकर तिथे पोहोचल्या नाहीत. तसेच जप्त करण्यात आलेली पूजा यांची Audi या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत होती. यामध्ये सरकारी नियमांनुसार, अपंगत्व प्रमाणपत्रासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे, परंतु पूजा यांच्या प्रमाणपत्रात रेशनकार्डचा वापर करण्यात आला.
अपंग कोट्यातून यूपीएससीमध्ये निवड झाल्यानंतर पूजा यांची अनेक अपंगत्व प्रमाणपत्रे बाहेर आली आहेत. पूजा खेडकर यांनी २०१८ आणि २०२१ मध्ये अहमदनगर जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलने यूपीएससी कडे दिलेले २ अपंगत्व प्रमाणपत्र सादर केले होते. पूजा यांनी त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची पुष्टी करण्यासाठी दिल्लीत वैद्यकीय तपासणीसाठी अनेक भेटी घेतल्या होत्या, परंतु नंतर त्यांनी एका खासगी रुग्णालयात केलेला अहवाल यूपीएससीकडे सादर केला.