महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता – अंबादास दानवे

- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भाजप काँग्रेसवर सडकून टीका

0

महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

– विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भाजप काँग्रेसवर सडकून टीका

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून गोंधळ सुरू असतानाच विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेप असल्यास काँग्रेसने जाहीर करावे. ते सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भात भाष्य केले. या संवादावेळी अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर सडकून टीका करीत काँग्रेसचा देखील खरपूस समाचार घेतल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता: राज्यातील सर्वच पक्ष विधानसभा निडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यात महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावरून तिन्ही पक्ष आणि त्यांचे नेते समोरासमोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याऐवजी एकत्रित निवडणूक लढणे हे महत्त्वाचे असल्याचे म्हटले जात आहे. तर काँग्रेस नेत्यांनी आम्हीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवू असा दावा केल्याने ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे हेच आश्वासक चेहरा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाड होईल असे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता: महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत आत्ताच बोलणे योग्य नाही, असे सांगत दानवे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांना चांगलेच सुनावले. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सरकार पुरस्कृत जाहिरातबाजी करून महिलांना एकत्रित केलं जात आहे. लाडक्या बहिणीला धमक्या आणि प्रलोभन दाखवत आहेत. लाडक्या बहिणींना थेट मदत करायची होती. सरकार त्यांना भीक देत आहे का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केल्याने शिंदे गटाकडून या वक्तव्याला विरोध केला जात आहे.

दंगली सरकार पुरस्कृत

नाशिक दंगलीसंदर्भात दानवे म्हणाले, हिंदू आक्रोश मोर्चात कोण सहभागी होते, ते आधी पाहा. शिवसेना हिंदुत्ववादी आहे. आम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. राज्यात आणि देशात हिंदुत्ववादी सरकार आहे मग आक्रोश कोणाकडे करायचा? या दंगली सरकार पुरस्कृत आहेत. त्यांना दंगली घडवून मतांची विभागणी करायची आहे. राज्य सरकारला हिंदू-मुस्लिम करून मतांची विभागणी करायची आहे, त्यामुळे दोघांनीही सावध राहिले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

आघाडी व युतीकडे ठाकरेंसारखा चेहरा नाही.

मुळात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांकडेही उद्धव ठाकरेंसारखा चेहरा नाही. त्यांच्या मागे जनमत असून ते महाविकास आघाडीतील एक आश्वासक चेहरा आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत सध्या बोलणे ठीक राहणार नसल्याचेही अंबादास दानवे म्हणाले. यावेळी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की,

Leave A Reply

Your email address will not be published.