पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादी आहेत

कॅनडात खलिस्तानी समर्थकांची मोदींवर अक्षेपार्य टीपण्णी

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी दहशतवादी आहेत

कॅनडात खलिस्तानी समर्थकांची मोदींवर अक्षेपार्य टीपण्णी

नवी दिल्ली : कॅनडात खलिस्तानी समर्थकांनी स्वामीनारायण या हिंदू मंदिरांबाहेर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणा लिहिल्या आहेत. यानंतर हिंदू समाजात संतापाची लाट उसळली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडातील हिंदू खासदार चंद्रा आर्य यांच्याविरोधात मंदिराच्या भिंतींवर घृणास्पद शब्दांचा वापर करण्यात आला आहे. खलिस्तानी समर्थकांनी लिहिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे खासदार आर्य हिंदू हे दहशतवादी आहेत आणि ते कॅनेडियन विरोधी आहेत. गेल्या काही वर्षांत, ग्रेटर टोरंटो एरिया, ब्रिटिश कोलंबिया आणि कॅनडातील इतर ठिकाणी हिंदू मंदिरांची द्वेषयुक्त भाषणे वापरून तोडफोड करण्यात आली आहे.

या घटनेबद्दल कॅनडाचे खासदार चंद्रा आर्य चिंतेत आहेत. ते म्हणाले की, ब्रॅम्प्टन आणि व्हँकुव्हरमधील खलिस्तानी समर्थकांनी रोड शोमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची छायाचित्रे दाखवून आणि प्राणघातक शस्त्रे दाखवून सार्वजनिकरित्या आनंद साजरा केला.

Leave A Reply

Your email address will not be published.