विद्यापीठाच्या निर्णयाला प्राध्यापकांचा विरोध
विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक डॉ. सर्जेराव जिगे यांचे कुलगुरूंना निवेदन
विद्यापीठाच्या निर्णयाला प्राध्यापकांचा विरोध
विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक डॉ. सर्जेराव जिगे यांचे कुलगुरूंना निवेदन
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ७ नोव्हेंबर रोजी युजीसीने काढलेल्या अधिसूचनेनुसार पेट परीक्षेकरिता रिक्त जागांची आकडेवारी जाहीर केली. याला विद्यापीठ विकास मंचचे निमंत्रक डॉ. सर्जेराव जिगे यांच्यासह संशोधनासाठी मार्गदर्शक करणाऱ्या प्राध्यापकांनी कुलगुरुंना दिलेल्या निवेदनाव्दारे विरोध दर्शवला आहे.
विद्यापीठाने ७ नोव्हेंबर रोजी युजीसीने काढलेल्या अधिसूचनेमुळे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयातील संशोधक मार्गदर्शक प्राध्यापकांकडे संशोधनासाठी रिक्त असलेल्या जागांचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे या संलग्नित महाविद्यालयातील संशोधक मार्गदर्शक प्राध्यापकांना यापुढे पेट परीक्षेतून उत्तीर्ण झालेले नवीन विद्यार्थी संशोधनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता घेता येणार नाहीत. परिणामी विद्यापीठाने या निर्णयाचा फेरविचार करावा.
सोन्या-चांदीचे दर कमी होण्याची शक्यता
मोदींना मराठा द्वेषाची डनगाळी
विद्यापीठाच्या निर्णयाला प्राध्यापकांचा विरोध
युजीसीच्या अधिसूचनेनुसार विद्यापीठाने कार्यवाही केल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिक्षेत्रात येणाऱ्या बहुजन विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी मिळणार नाही. ते विद्यार्थी या संशोधन कायार्पासून वंचित राहणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मराठवाड्यासारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. यामुळे अधिसूचनेपूर्वीचे संशोधन मार्गदर्शक या अधीसूचनेच्या प्रभावात येणार नाहीत, असा निर्णय घ्यावा.
मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे कोझिकोडमध्ये मुलाचा मृत्यू
महसूल कर्मचाऱ्यांच्या बंदमुळे नागरिकांचा खोळंबा
नव्याने होऊ घातलेल्या मार्गदर्शकांनाही संशोधन-मार्गदर्शन करण्याचा मार्ग खुला करावा यामुळे अशी मागणी केली आहे. यामुळे मराठवाड्यासारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर होईल, असे विद्यापीठ विकास मंचच्या वतीने कुलगुरुंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.