बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकुन निषेध

- सुपारीबाज चले जावच्या घोषणेमुळे शिवसेना मनसे कार्यकर्ते समोरासमोर

0

बीडमध्ये राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकुन निषेध

– सुपारीबाज चले जावच्या घोषणेमुळे शिवसेना मनसे कार्यकर्ते समोरासमोर

बीड : सुपाऱ्या फेकुन निषेध: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बीडमध्ये आले असता चांगलाच गोंधळ उडाला. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकून “सुपारीबाज चले जाव”, “कोणाची सुपारी घेऊन आलात” अश्या घोषणाबाजी केली. यावेळी मात्र ठाकरे गटाच्या या कार्यकर्त्यांना मनसे कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. हा संघर्ष सुरू असताना पोलिसांनी हस्तक्षेप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

सुपाऱ्या फेकुन निषेध: महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही म्हणणारे राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यात त्यांना यापूर्वी धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर नांदेडमध्येही त्याच्यासोबत तेच घडले जे बीड जिल्ह्यामध्ये घडले. यावेळी मात्र उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपारीबाज चलो जाव म्हणत जोरदार घोषणाबाजी देखील केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप केला.

यापूर्वी राज ठाकरे यांच्यावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुपारीबाज असा आरोप केला होता. त्यानंतर अमोल मिटकरी विरुद्ध मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यात आता उद्धव ठाकरे गटाने राज ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला त्यांच्या गाडीसमोर मोठ्या प्रमाणात सुपाऱ्या फेकून राज ठाकरे यांचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी सुपारीबाज चले जाव अशा घोषणा देखील दिल्या. त्यानंतर राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.