पुण्यश्लोक अहिल्यादेवी घरकुल योजनेचा अध्यादेश जारी

- जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांच्या प्रयत्नांना यश

0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी घरकुल योजनेचा अध्यादेश जारी

– जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांच्या प्रयत्नांना यश

जालना : प्रतिनिधी
राज्यातील धनगर समाज बांधवांकरीता पुण्यश्लोक अहिल्यादेवी घरकुल योजना राबवावी यासाठी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले असून महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचाअध्यादेश सोमवारी जारी केला आहे. सदर योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील ६,९४३ लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल मिळणार आहे.

जालना शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारकसाठी जागा व एक कोटी निधी मंजूर, जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहासाठी तीन कोटी निधी, सदर योजना जाहीर करून उपेक्षित समाजास न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार, पालकमंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, खा. डॉ. विकास महात्मे यांचे आभार मानले. तसेच आमदार संतोष पा दानवे, आमदार नारायण कुचे, भास्कर दानवे यांनी कपिल दहेकर यांचे अभिनंदन केले आहे.

८६ कोटी ६४ लाख रुपयांची तरतूद

धनगर समाजासाठी इतर योजना आणि निधी जालना जिल्हात पाठपुरावा करून मंजूर करून आणली आहेत. राणा – वनात मेंढीपालन, मोल मजुरी करून जीवन जगणाºया भटक्या विमुक्त जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजासाठी ही योजना सुरू करावी अशी मागणी शासनाने या संदर्भातला आदेश जारी केला. त्यानुसार प्रती लाभार्थी १.२० लाख रुपये प्रमाणे ८६ कोटी ६४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.