राज ठाकरे पक्ष संपवण्यासाठीच मराठवाड्याच्या दौऱ्यावर
-प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा राज ठाकरे यांना सवाल
जालना : मला राज ठाकरे यांच्या विचारांची कीव येते. राज ठाकरे हे मनसे पक्ष संपवण्यासाठीच मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत का? मनसेचे राज ठाकरे तुम्ही खरेच प्रबोधनकार ठाकरे यांच्या घराण्यात जन्मलात का? असा सवाल प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सोलापूर नंतर धाराशिव येथे पदाधिकाऱ्याची बैठक घेतली. मात्र धाराशिव येथे मुक्कामी असतानाच राज ठाकरे यांना मराठा आंदोलकांच्या रोशाचा सामोरे जावे लागले आहे. ठाकरे ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत त्या बाहेर मराठा समाजातील आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी राज ठाकरे आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे दिसून आले.
सर्व्हर डाऊनमुळे रेशन कार्डधारकांच्या आडचणीत वाढ
घाटीतील नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगची घटना
जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
मराठा आंदोलक त्यांच्यावर नाराज झाले. त्यात मनोज जरांगे पाटील यांनी देखील राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केली. त्यानंतर आता ओबीसी समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. एकीकडे प्रकाश आंबेडकर यांनी कुणबी समाजावर टीका करून त्यांच्या आरक्षणाला विरोध केला असला तरी मात्र दुसरीकडे राज्यातील कुणबी बांधव यांनी ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन प्राध्यापक हाके यांनी केले आहे.
कुणबी बांधव कुठे आहेत?
कुणबी बांधवांचा आरक्षणातील लढ्यातील रोल काय? कुणबी बांधव कुठे आहेत? कुणबी नेते कुठे आहेत? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित करीत कुणबी समाजातील नेत्यांनी ओबीसी आंदोलनात सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन देखील प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केले आहे.