जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
– २४ तासांत ७ टक्के वाढ, एकूण पाणीसाठा १८ टक्कयांवर
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणात दाखल होणाऱ्या पाण्याची आवक सोमवारी ६६ हजार ३६७ क्युसेकच्या वर सुरू होती. यामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मागील २४ तासांत ७ टक्के वाढ झाली आहे. सोमवारी रात्री उशिरापर्यंत जायकवाडीचा पाणीसाठा १८ टक्कयांवर गेला होता. यात रात्रीतून आणखी दोन टक्के पाणी वाढ होईल, असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले.
दुकाने व आस्थापनांची वेळोवेळी तपासणी करा
जालना-नांदेड प्रस्तावित समृद्धी महामागार्तील शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा
बीड जिल्ह्यात 98 हजार 173 जणांना जातवैधता प्रमाणपत्र
जायकवाडी धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पिण्याच्या पाणीपुरवठा योजना आहेत. आठ दिवसांत जायकवाडीचा पाणीसाठा ४.१२ टक्क्यांवरून सोमवारी १६ टक्क्यांवर गेला होता. यामुळे मराठवाड्यातील पाणीप्रश्न मिटला आहे. सध्या आवक बघता पाणीसाठ्यात आणखी वाढ होणार आहे.
रविवारी रात्रीत पाणीसाठ्यात ६ टक्के वाढ
जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक सोमवारी वेगाने होती. यामुळे रात्रीतून पाणीसाठ्यात २ टक्के वाढ होईल, असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव व गणेश खराडकर यांनी सांगितले. रविवारी रात्रीत पाणीसाठ्यात ६ टक्के वाढ झाली आहे.