बीडमधून रविकांत राठोड यांनी केली समनक जनता पार्टीशी गद्दारी – अखेरच्या दिवशी गुपचूपपणे नामांकन मागे घेतल्याने पक्षातुन हकालपट्टी

0 289

बीडमधून रविकांत राठोड यांनी केली समनक जनता पार्टीशी गद्दारी

– अखेरच्या दिवशी गुपचूपपणे नामांकन मागे घेतल्याने पक्षातुन हकालपट्टी 

बीड : बीड लोकसभा मतदारसंघात समनक जनता पार्टीने रविकांत अंबादास राठोड यांना उमेदवारी दिली होती मात्र नामांकन अर्ज वापस घेण्याच्या अखेरच्या दिवशी समनकचे अधिकृत उमेदवार रविकांत अंबादास राठोड यांनी पक्षाशी गद्दारी करुन गुपचूपपणे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठींबा दिलेला आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर रविकांत राठोड यांनी मी अपक्ष उभा होतो असे धांदातपणे मिडीयाला मुलाखत देतांना खोटे बोलले आहे समनक जनता पार्टी कडून एबी फॉर्म भरुन उमेदवारी दाखल केल्याचा निवडणूक अधिकारी बीड यांनी यादी प्रसिद्ध करतांना नमुद केलेले असताना सुद्धा रविकांत अंबादास राठोड यांनी अपक्ष उभा होतो असे म्हटले आहे. अखेरच्या दिवशी गुपचूपपणे नामांकन मागे घेतल्याने पक्षातुन हकालपट्टी केल्याची माहिती समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. रामकृष्ण कालापाड यांनी दिली.

आपल्या मुलाखतीत त्यांनी असेही म्हटलेले आहे की, पोहरागडच्या महंतांच्या आदेशाने मी उमेदवारी अर्ज मागे घेऊन महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना पाठींबा देत आहे. तसे पाहता पोहरागडचे महंत कधीच सामाजिक आरक्षणाविरुद्ध भूमिका कधी घेतलेली नाही, भविष्यात सुद्धा घेणार नाही मग आरक्षण विरोधी भूमिका घेणार्या भाजप पक्षाच्या उमेदवारांना  पाठींबा देण्याचे महंतमंडळी सांगूच शकत नाही तरीसुद्धा  त्यांना गोरबंजारा समाजात बदनाम करण्याचे पातक रविकांत अंबादास राठोड यांनी केले आहे.
या प्रेसनोट द्वारे असे जाहीर करण्यात येत आहे की रविकांत अंबादास राठोड यांच्या दलबदलू धोरणाचे समनक जनता पार्टी व गोरबंजारा समाज कदापी समर्थन करु शकत नाही. त्यांच्या अपप्रचाराला समनक जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बळी पडू नये असे आवाहन समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संपत चव्हाण व  समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. रामकृष्ण कालापाड यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.