पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

-हिंसक वातावरणामुळे शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले

0

पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

-हिंसक वातावरणामुळे शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले

ढाका : बांगलादेशात मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आरक्षणविरोधी विद्यार्थी आंदोलनाचा खुप मोठा परिणाम पडला आहे. यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी, ५ ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या आंदोलनाला लागलेल्या हिंसक वातावरणामुळे शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले आहे.

शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या लष्करी विमानाने निघाल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची बहीण रेहानाही आहे. त्या बंगालमार्गे दिल्लीत पोहोचल्या असल्याची माहिती समोर येत आहे. हसीना ज्या विमानाने आल्या ते विमान गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर उतरले आहे. त्या लंडन, फिनलँड किंवा इतर कोणत्याही देशात जाऊ शकतात अशी माहिती समोर येत आहे.

यापूर्वी बांगलादेशा शेजारील श्रीलंकेत आर्थिक संकटानंतर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांच्या सरकारविरोधात हिंसक आंदोलन झाले होते. अशी परिस्थिती जुलै २०२२ मध्ये निर्माण झाली होती. सरकारच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले आणि राष्ट्रपती भवनात घुसले होते.

आम्ही अंतरिम सरकार स्थापन करू

आम्ही अंतरिम सरकार स्थापन करू, आम्ही आता देश ताब्यात घेऊ. आंदोलनात ज्यांची हत्या झाली आहे, त्यांना न्याय मिळवून दिला जाईल, असे बांगलादेशचे लष्करप्रमुख म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.