अमेरिकेत कोरोनाचे पुनरार्गमन – कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ झाल्याने पुन्हा एकादा मास्क सक्ती

0 478

अमेरिकेत कोरोनाचे पुनरार्गमन
– कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ झाल्याने पुन्हा एकादा मास्क सक्ती

वॉशिंग्टन : अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनी अहवाल दिला की आता देशात एक नवीन कोवीड (केपी.३ कोवीड स्ट्रेन) प्रकार उदयास आला आहे. या प्रकाराचे नाव केपी.३ आहे जे आता अमेरिकेतील २५ टक्कयांहून अधिक कोरोनाग्रस्तांमध्ये आढळले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजनां पालन करणे हे महत्त्वाचे मानले जात असून मास्क घालणे, शारीरिक अंतर राखण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुन्हा महामारी येणार? – चीनकडून आयसीयू बेडची संख्या वाढवण्यावर भर

सिंगापूरमध्ये कोरोना संक्रमणाच्या संख्येत ९० टक्क्यांची वाढ – भारतात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये संक्रमित लोकांची संख्या सर्वाधिक
नवीन व्हेरियंट आधीच्या जेएन.१ व्हेरियंटपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे सिद्ध होत आहे. ओमिक्रॉन पासून मिळवलेले केपी.३ प्रकार आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, केपी.३ प्रकार (कोरोना नवीन प्रकार केपी.३) विरूद्ध लस प्रभावी ठरत आहेत. या प्रकाराच्या आजाराजाची लक्षणे सौम्य ते गंभीर अशी असू शकतात. सामान्य लक्षणांमध्ये ताप, कोरडा खोकला आणि थकवा, त्यानंतर सांधेदुखी, डोकेदुखी आणि घसा खवखवणे यांचा समावेश होतो.

कोव्हॅक्सिन’ लस घेतल्यांनानाही होऊ शकतात रक्ताच्या गुठळ्या! – ‘बीएचयू’ च्या संशोधनातील निष्कर्ष

कोवॅक्सिनच्या दुष्परिणामानंतर आयसीएमआरची बनारस हिंदू युनिव्हर्सिटीस नोटीस – लसीचे दुष्परिणाम आढळून आल्याचा दावा दिशाभूल करणारा आयसीएमआरचे मत
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या अनेक लोकांमध्ये चव किंवा वास कमी होणे हे विषाणूचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण असल्याचे आढळून आले आहे. रुग्णांमध्ये उलट्या आणि जुलाब यांसारखी गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे देखील दिसून आली आहेत. काही व्यक्तींमध्ये त्वचेची लक्षणे देखील नोंदवली गेली आहेत, ज्यात पुरळ उठणे आणि बोटांचा रंग मंदावणे यांचा समावेश आहे. तर, काही रुग्णांमध्ये लक्षणे नसणे सामान्य आहे. त्याच वेळी, न्यूमोनिया आणि श्वास घेण्यात अडचण यासारख्या घातक गुंतागुंत देखील विकसित होऊ शकतात.

कोरोना लस उत्पादक कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाकडून जगभरातील लस विक्री थांबवण्याचा निर्णय – बाजारातून लस काढून टाकली जाणार असल्याची कंपनीकडून माहिती

लसीच्या माध्यमातून शरिरामध्ये जे घेतले ते आपलं दुर्भाग्य आहे – अभिनेता श्रेयश तळपदे यांचे खळबळजनक वक्तव्य
हृदयरोग असलेल्या लोकांना गंभीर लक्षणे
वृद्ध आणि मधुमेह किंवा हृदयरोग असलेल्या लोकांना गंभीर लक्षणे आणि गुंतागुंत होण्याची शक्यता असते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना चाचणी, लस घेणे आणि सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजनांचे पालन करणे हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते. त्याच वेळी वैयक्तिक प्रयत्नांमध्ये मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे आणि वारंवार साबण आणि पाण्याने हात धुणे किंवा हँड सॅनिटायझर वापरणे समाविष्ट आहे.
कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांना तात्काळ भरपाई द्या – न्यायालयाने केंद्रसरकारला निर्देश द्यावेत याचिकेद्वारे मागणी

कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप – कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत लस उत्पादक कंपनीकडून कबुली

Leave A Reply

Your email address will not be published.