एआयद्वारे ईव्हीएम हॅक होण्याचा धोका – इलॉन मस्क यांचा दावा

0 27

एआयद्वारे ईव्हीएम हॅक होण्याचा धोका
– इलॉन मस्क यांचा दावा

नवी दिल्ली : अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांच्या वक्तव्यानंतर भारतीय राजकारणात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनचा वाद पुन्हा एकदा उठला आहे. विरोधक सतत ईव्हीएमला मुद्दा बनवत आहेत. हे प्रकरण इतके वाढले की, भारताच्या निवडणूक आयोगालाही पत्रकार परिषदेत आपले म्हणणे मांडावे लागले. दुसरीकडे भाजप नेत्यांनी या मुद्द्यावरून विरोधकांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याविषयी इलॉन मस्कने आपल्या खात्यावर लिहिले होते की आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) काढून टाकली पाहिजेत. कृत्रिम बुद्धिमत्ता एआयद्वारे मानवांव्यतिरिक्त ईव्हीएम हॅक होण्याचा धोका आहे.
याविषयी राहूल गांधी म्हणाले की, ईव्हीएम हा भारतातील ब्लॅक बॉक्स आहे. त्याची चौकशी करण्यास कोणालाही परवानगी नाही. आमच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही धोक्यात येते. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता वाढते. तसेच इलॉन मस्क यांच्या विधानावर माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, त्यांचे ईव्हीएमवरील विधान अगदी सामान्य समजुतीसारखे आहे की कोणतीही व्यक्ती पूर्णपणे सुरक्षित डिजिटल हार्डवेअर बनवू शकत नाही. असा विचार करणे चुकीचे आहे. मस्कचे विधान अमेरिका आणि इतर ठिकाणी लागू होऊ शकते. जिथे इंटरनेट कनेक्ट व्होटिंग मशीन बनवण्यासाठी एक साधा संगणक प्लॅटफॉर्म वापरला जातो. पण भारतातील ईव्हीएमची रचना सुरक्षितपणे करण्यात आली आहे. तर जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले की, ईव्हीएमवरील हा वाद निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर संपला पाहिजे. निवडणूक निकालानंतर लगेचच कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याने कोणतेही प्रश्न उपस्थित केले नाहीत, परंतु इलॉन मस्क यांच्या एका पोस्टनंतर हा मुद्दा तापला.
मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, आपण ईव्हीएमला देव किंवा दानव बनवू नये. ईव्हीएम अनेक चाचण्यांमधून गेले आहे. आधी राष्ट्रीय पातळीवर लोक त्यावर हल्ले करायचे आणि आता काही इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट किलर त्याच्या विरोधात उभे ठाकले आहेत. यावर अखिलेश यादव म्हणाले की, तंत्रज्ञान हे समस्या सोडवण्यासाठी आहे. परंतु जर ते समस्यांचे कारण बनले तर त्याचा वापर बंद केला पाहिजे. आज जगभरातील अनेक निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ईव्हीएम वापरण्याच्या आग्रहामागचे कारण काय? भाजपने हे स्पष्ट करावे असेही म्हणाले.
इलॉन मस्क यांनी फुकटचा सल्ला देऊ नय
इलॉन मस्क यांच्या वक्तव्याला विरोध करताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले की, इलॉन मस्क यांनी आम्हाला फुकटचा सल्ला देऊ नये. तिथे बसून त्यांनी वाहने करावीत. तर सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसल्याचे म्हटले आहे. ते केवळ त्यांच्या मनोरंजनासाठी म्हणतात. ईव्हीएममध्ये काही गडबड असती तर आज इतक्या जागा मिळाल्या नसत्या. कर्नाटकातही राहतात. ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करून ते आपली कमजोरी दाखवत आहेत.
ईव्हीएम ओटीपीद्वारे अनलॉक होत नाही
भारतीय निवडणूक आयोग मस्कच्या वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितले की, ईव्हीएम कोणत्याही ओटीपीद्वारे अनलॉक होत नाहीत. हे स्वत: एक स्वतंत्र मशीन आहे. यामध्ये वायर्ड किंवा वायरलेस कम्युनिकेशनची कोणतीही व्यवस्था नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.