वैजापुर तालुक्यातील नदी नाले कोरडेच

‑ समाधानकारक पाऊन न झाल्याने शेतकरी चिंतेत

0

वैजापुर तालुक्यातील नदी नाले कोरडेच

‑ समाधानकारक पाऊन न झाल्याने शेतकरी चिंतेत

वैजापुर : वैजापुर तालुक्यातील नदी नाले कोरडेच: लोणी खुर्द राज्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी तालुक्यातील तलवाड्यासह लोणी खु परिसरात अद्याप चांगला पाऊस नसल्याने ठेकु नदी कोरडीठाक असून, बंधारे तसेच परिसरातील ओढे, नद्या कोरडे आहेत. पाऊस नसल्याने विहिरींना पाणी उतरले नसल्याने पोळ कांद्याची रोपे तयार करता आलेली नाहीत असे शेतकरी सांगतात. मागील तीन वर्षांपासून चांगला पाऊस नसल्याने या परिसरातील शेतकरी चिंतेत दिसत आहेत. त्यात यंदाही पाऊस नसल्याने नदी, नाले कोरडेच दिसत आहेत.

वैजापुर तालुक्यातील नदी नाले कोरडेच: यावर्षी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाला असून, अनेक ठिकाणी जास्त पावसाने शेतीसह घरांचे नुकसान झाले आहे. पुरामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. मात्र याच्या पूर्ण विरोधी स्थिती वैजापुर तालुक्यातील अनेक गावांतील वाहणारे ओढे ठेकु नदी कोरडीठाक आहे. यावर्षी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. लोणी खु परिसरात मागील आठवड्यात अल्पसा पाऊस झाला. शेतातील पिकांना पावसाचा फायदा झाला असला तरी अद्याप विहिरी, नद्या, नाले बंधारे कोरडेच आहे. आता तरी या भागातील बंधारे भरावेत, अशी प्रार्थना शेतकरी करत आहे सहा महिन्यांपासून विहिरींनी तळ गाठला जिल्ह्याच्या तुलनेत या भागात पाऊस कमी झाल्याने शेतातून अद्याप पाणी वाहिले नसल्याने विहिरी कोरड्या आहेत. पोळ कांदा रोपे तयार करण्यासाठी शेतकरी सज्ज झाला असून, ही रोपे तयार करण्यास पावसाअभावी उशीर होत आहे. एकीकडे पावसा पावसा थांब अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

सिंचन विभागाचे दुर्लक्ष

तालुक्यातील लोणी खु. तलवाडा चिकटगाव भादली टुनकी बाभुळतेल आदि गावांसह परिसरातील शेतकरी पावसाची वाट बघत आहेत, साठवण क्षमतेलाच झुडपांमुळे धोका तलवाडा येथील नागवाडीचा खळगा बंधारा १९८० मध्ये तयार करण्यात आला. सध्या या प्रकल्पात काटेरी झुडप व गाळ आहे. याकडे सिंचन विभागाचे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. विभागाने लक्ष देऊन किमान कटेरी झुडप काढावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.