सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर

सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत संबंधित शाळेत उपस्थित राहतील

0

सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर

सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत संबंधित शाळेत उपस्थित राहतील

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्खळीत झाले आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेनुसार पुणे, मुंबई, सातारा, रायगड, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी यांना अलर्ट जरी केला आहे. त्यात सातारा आणि पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व वाचले क्र. २ च्या शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. 

शाळांना उद्या सुट्टी जाहीर

सातारा जिल्ह्यात आणि घात क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने सातारा जिल्ह्यातील शाळा दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्याचे श्री जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांच्या आदेशानुसार देण्यात आले आहेत. 

यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबईच्या शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सातारा जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगर पालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रम शाळा, सर्व महाविद्यालये व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या सर्व विद्यार्थ्यांना दिनांक २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत संबंधित शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करतील, तसेच इयत्ता १० वी व १२ वी च्या जुलै २०२४ च्या फेर परीक्षा राज्य मंडळ पुणे यांचे वेळापत्रकानुसार सुरु राहतील.

Leave A Reply

Your email address will not be published.