सर्व्हर डाऊनमुळे रेशन कार्डधारकांच्या आडचणीत वाढ
– ई-पॉस मशीनची अंत्ययात्रा काढून निषेध
मंठा : सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे रेशन कार्डधारकांना धान्य देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव काळे यांच्या नेतृत्वाखाली ई-पॉस मशीनची अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला. सर्व इ- पॉस मशीन जमा करून घ्याव्यात अशी मागणी करून नायब तहसीलदार डी.एस.बागल यांना निवेदन दिले.
रेशन कार्डधारकांना धान्य देण्यास अडचणी निर्माण होत असून परिणामी दुकानदार व कार्डधारकात यांच्यात अनेक वेळा वाद उत्पन्न होत आहेत. सध्या माहे जुलै महिन्याचे धान्यवाटप सुरू असून १७ जुलैपासून सर्व्हर समस्येमुळे चालत नाहीत. कार्डधारकांच्या रोषाला स्वस्त धान्य दुकानदारांना सामोरे जावे लागत असून अनेक वेळा मागणी करूनही पुरवठा विभागाकडून समाधानकारक तोडगा काढण्यात आलेला नाही. सर्व्हर डाऊन च्या समस्येमुळे राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्याकडील इ – पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा करण्याचा निर्णय घेतला.
घाटीतील नर्सिंग कॉलेजमध्ये रॅगिंगची घटना
जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
दुकाने व आस्थापनांची वेळोवेळी तपासणी करा
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी सोमवारी ई पॉस मशीनची प्रेतात्मक अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला. निवेदनावर शिवाजी बोराडे, दादाराव हिवाळे, व्ही.एन. कांगणे, आर.आर. कुलकर्णी, सुधीर जोशी, सुरेश आष्टीकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.