Shikhar Dhavan Announced his retirement शिखर धवन फलंदाजाने क्रिकेटमधून पूर्णतः निवृत्ती X वरून व्हिडिओ शेअर

0

Shikhar Dhavan Announced his retirement शिखर धवन या फलंदाजाने पूर्णतः क्रिकेटमधून निवृत्ती X वरून व्हिडिओ शेअर

शिखर धवन भारताच्या क्रिकेटमधील सलामीवीर यांनी क्रिकेटमधून निवृत्तीचा व्हिडिओ सोशल मीडिया X प्लॅटफॉर्म वर शेअर केला त्यात ते म्हणतात
“सर्वाना माझा नमस्कार, आज मी आयुष्याच्या अशा वळणावर उभा आहे जिथून पाठीमागे वळून पाहिल्यास केवळ आठवणी दिसतात, आणि पुढे पाहिल्यास पूर्ण जग. माझी कायम एक इच्छा असायची कि देशासाठी चांगले खेळणे आणि ती पूर्ण हि झाली. ज्यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे. ज्यात माझा परिवार, माझे लहानपणीचे कोच मदन शर्माजी ज्यांच्याकडून मी क्रिकेट शिकलो. माझी टीम ज्यांच्यासोबत मी अनेक वर्ष खेळलो, ज्यांच्यामुळे मला एक नवीन परिवार मिळाला, नाव मिळाले, आणि सर्वांचे प्रेम मिळाले, म्हणतात कि कहाणीमध्ये पुढे जाण्यासाठी पाने उलटने महत्वाचे आहे, तेच मी करायला जात आहे. मी जाहीर करतो कि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळातून निवृत्ती घेत आहे. आणि जेंव्हा मी क्रिकेट विश्वाला अलविदा करत असताना माझ्या मनाला शांती मिळत आहे कि मी माझ्या देशासाठी खूप खेळलो. आणि मी BCCI चा आभारी आहे ज्यांनी मला संधी दिली. मी माझ्या सर्व चाहत्यांचाही आभारी आहे ज्यांनी मला एवढे प्रेम दिले. मी आनंदी आहे कि मी माझ्या देशासाठी खेळू शकलो आणि हि माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे.”

शिखर धवनने 1999 च्या विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये दिल्ली अंडर-16 सह त्याच्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात केली. आपल्या कारकिर्दीत 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले. निवृत्ती वेळी धवनचे वय 38 वर्ष आहे. तसेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 आणि 2017 मध्ये सलग गोल्डन बॅट्स जिंकल्या. 2015 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही तो भारतीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर होता, जिथे भारत उपांत्य फेरीत यशस्वी ठरला.

यावर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ड्रेसिंग रूममध्ये शिखर धवनचे अभिनंदन केले. तसेच सोशल मिडीयावर
“शिकीच्या शानदार कारकिर्दीसाठी अभिनंदन! मला माहित आहे की तुम्ही भविष्यात जे काही हाती घ्याल त्यातून तुम्ही समान आनंद पसरवाल! @SDhawan25” अशा शुभेच्छा दिल्या.
शिखर धवनचा शेवटचा आंतरराष्ट्रीय खेळ 2022 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान आला, ज्याने त्याच्या प्रसिद्ध कारकिर्दीचा शेवट केला. 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये त्याने 17 शतके आणि 39 अर्धशतकांसह 44.11 च्या सरासरीने 6,793 धावा जमवल्या.

हार्दिक पंड्या यांनीही शिखर यांना आपल्या इंस्टाग्रामद्वारे शुभेच्छा दिल्या “शिखी पा तुमच्यासाठी फक्त सर्वोत्तम आहे. अप्रतिम कारकीर्दीबद्दल अभिनंदन.”
श्रेयस अय्यरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम प्रोफाइलवर एक कथा पोस्ट केली, “अभिनंदन @shikhardofficial paa. भविष्यात तुमच्यासाठी जे काही आहे त्यासाठी सर्व शुभेच्छा.”

माजी भारतीय सलामीवीर वसीम जाफर यांनी धवनला शुभेच्छा X प्रोफाइलवर शुभेच्छा दिल्या – “मोठ्या स्पर्धांसाठी एक माणूस. त्याला योग्य ते कौतुक कधीच मिळाले नाही पण त्याला माहीत असल्याने जोपर्यंत संघ जिंकत होता तोपर्यंत कोणाला टाळ्या मिळाल्या याची त्याला पर्वा नव्हती. माध्यमातून एक संघ माणूस. उत्कृष्ट कारकीर्दीबद्दल अभिनंदन आणि तुमच्या दुसऱ्या डावासाठी शुभेच्छा @SDhawan25”

शिखरच्या निवृत्तीबद्दल बीसीसीआयने मेसेज शेअर केले: “शिखर धवन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्त होत असताना, आम्ही त्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो”

शिखरने 2010 मध्ये क्रिकेटच्या कारकिर्दीची सुरुवात दोन चेंडूत शून्यातून केली होती, परंतु लवकरच त्याने भारतीय टिममध्ये एक सलामीवीर म्हणून आपले स्थान निश्चित केले. सलामीच्या ठिकाणी रोहित शर्मासोबतची त्याची भागीदारी भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सुवर्ण अध्याय ठरली.

Leave A Reply

Your email address will not be published.