उस्मानपुरा चौकात सुनावणी होण्याआधीच झाडाची कत्तल
-अभियंत्यांने प्रक्रियेलाच हरताळ फासल्याचे समोर
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
शहरातील उस्मानपुरा चौकात सौंदर्यबेटाचे काम सुरू आहे. या कामात दोन झाडे येत असल्याने ती तोडण्यापूर्वी आक्षेप मागवण्यात आले. मात्र संबंधित काम पाहणाºया या अभियंत्यांने आक्षेपांवर सुनावणी होण्याआधीच एका झाडाची कत्तल करण्यात आली आहे. यामुळे प्रक्रियेलाच हरताळ फासल्याचे समोर आले आहे. उद्यान अधीक्षक उपस्थित नसल्याने पूर्वसूचना न देता सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे कायदेशीर आयुक्तांना काही महत्व आहे की नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयामुळे राजकारणात खळबळ
मंत्री ठाकुर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
मिनी घाटी रुग्णालयात शस्त्रक्रिया रखडल्या
शहरामध्ये विकास कामाच्या नावाखाली वृक्षतोडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी जीव्हीपीआरने जळगाव रस्त्यालगत असलेल्या ग्रीन झोनमधील शेकडो झाडांची कत्तल केली. काही-दिवसांपूर्वीच उद्यानाच्या दुसºया बाजूला असलेल्या एका खासगी-शाळेला रस्ता करून देण्यासाठी उद्यानातील झाडे तोडण्याचा घाट मनपा – प्रशासनाने घातला होता.
आता गोपाल – टी कॉर्नर येथे सौंदर्य बेट विकसित करण्याचे काम मनपातर्फे हाती घेण्यात आले आहे. त्या ठिकाणी असलेले लिंबाचे झाड विकास कामास अडथळा ठरत असल्याचे सांगत तोडण्याची परवानगी मागण्यात आली आहे. हे झाड विकास कामात अडथळा ठरत नाही. त्यामुळे ते तोडू नये, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.
शहरात विविध ठिकाणी विकासकामे सुरू असून त्यात आड येणारी झाडे तोडण्यापूर्वी त्यावर आक्षेप मागवण्यात आले. याबाबतची जाहिरात २२ जुलै रोजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार उस्मानपुरा येथील सौंदर्यबेटात असलेल्या २ झाडांचा कुठलाही अडथळा नाही. ती तोडण्यास आमचा आक्षेप आहे, असे म्हणणारे दोन अर्ज पालिकेला मिळाले. त्यानुसार बुधवारी दुपारी ४ वाजता मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र उद्यान अधीक्षक बाहेरगावी असल्याने हजर राहिले नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी अधीक्षकांच्या उपस्थितीतच सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला.