स्मार्ट मीटर बसवणार सरकारी कार्यालयांमध्ये
घरातील स्मार्ट मीटर योजनेला नागरिकांचा वाढता विरोध
स्मार्ट मीटर बसवणार सरकारी कार्यालयांमध्ये
– घरातील स्मार्ट मीटर योजनेला नागरिकांचा वाढता विरोध
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन योजनेअंतर्गत देशभर स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटर बसवण्याचा कार्यक्रम ऑगस्ट २०२१ मध्ये जाहीर केला. यामध्ये देशात मार्च २०२५ अखेरपर्यंत २२.२३ कोटी मीटर लावण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र हा निर्णय झाल्यानंतर या योजनेला नागरिकांमधून तीव्र विरोध होताना दिसत आहे. यामुळे यामुळे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणार नसल्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना नागरिकांच्या घरी नाही, तर केवळ सरकारी कार्यालयांमध्ये हे मीटर बसवणार असल्याचे सांगितले.
शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, काय आहे प्रकरण?
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने डाव टाकला
स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटर बसवण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्याला जोरदार विरोध होत आहे. त्यामुळे तो निर्णय तात्काळ थांबवला असला तरी याबाबत विधिमंडळातही याबाबत त्यांनी घोषणाच केली. मात्र अदानींसह चार कंपन्यांना दिलेल्या २.२५ कोटी मीटरच्या ६ निविदा अद्याप रद्द केलेल्या नाहीत. या निविदा तब्बल २७,००० कोटींच्या आहेत. विशेष म्हणजे प्रीपेड मीटरबाबत महावितरणला आतापर्यंत कोणतेही आदेश अधिकृतपणे मिळालेले नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा प्रीपेड मीटर बसवण्याचा निर्णय घेणार का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. नागरिकांच्या घरात स्मार्ट मीटर लागणार नाही, अशी घोषणा ऊजार्मंत्र्यांनी केली. पण, या मीटरसाठी दिलेले कंत्राट रद्द झालेले नसून संबंधित कंपन्यांचे कामही सुरू आहे. सरकारने कंपन्यांना दिलेल्या निविदा रद्द कराव्यात, असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे म्हणाले.
कोरोनाच्या मृत्यूची सरकारी आकडेवारी खोटी असल्याचे उघड
कुटेंविरूध्दच्या वॉरंटसाठी पोलिस न्यायालयात
मीटरचे सर्वात मोठे कंत्राट अदानींना
राज्यात स्मार्ट मीटर बसवण्यासाठी ६ निविदा काढण्यात आलेल्या होत्या. यातील १.१६ कोटी मीटरचे सर्वात मोठे कंत्राट अदानींना मिळालेले आहे. नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला ५७ लाख मीटरच्या २ निविदा, माँटे कार्लो कंपनीला ३०.३० लाख मीटरचे १ टेंडर आणि जीनस कंपनीची २१.७६ लाख मीटरची १ निविदा अंतिम झालेली आहे. महावितरण कंपनीने काढलेल्या टेंडर्सना ७ आॅगस्ट २०२३ रोजीच मंजुरी मिळाली असून त्यानुसार संबंधित पुरवठादारांना मंजुरीपत्रही देण्यात आले आहे. अदानी, नागार्जुन कन्स्ट्रक्शन (एनसीसी), माँटे कार्लो व जीनस कंपनींना प्रीपेड मीटरची ६ कंत्राट मिळालेली आहेत.
मीटर संख्या झोननिहाय
पुरवठादार झोन मीटर संख्या रक्कम (कोटीत) अदानी भांडूप, कल्याण, कोकण ६३,४४,०६६ ७५९४.४५ अदानी बारामती, पुणे ५२,४५,९१७ ६२९४.२८ एनसीसी नाशिक, जळगाव २८,८६,६२२ ३४६१.०६ एनसीसी लातूर, नांदेड,संभाजीनगर २७,७७,७५९ ३३३०.५३ माँटे कार्लो चंद्रपूर, गोंदिया, नागपूर ३०,३०,३४६ ३६३५.५३ जीनस अकोला, अमरावती २१,७६,६३६ २६०७.६१