महसूल मंत्री विखेंच्या उपस्थितीत राज्य तलाठी संघाची बैठक

महसूल कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्याची विखेंची ग्वाही

0

महसूल मंत्री विखेंच्या उपस्थितीत राज्य तलाठी संघाची बैठक

-महसूल कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्याची विखेंची ग्वाही

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य तलाठी संघाची बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत तलाठ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी सर्व प्रश्न सोडवण्याची ग्वाही विखे पाटील यांनी दिली. या बैठकीस अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, सहसचिव संजय बनकर, कक्ष अधिकारी माने व इतर अधिकारी हजर होते.

जिल्हा स्तरावरील आस्थापना इतर गट क कर्मचाऱ्यांप्रमाणेच जिल्हास्तरावरच राहील मात्र यामध्ये ऑनलाइन बदल्या किंवा इतर सुधारणा अभ्यास गटाच्या निष्कषार्नंतर करण्यात येतील, असे सांगण्यात आले. या मुद्द्यावर राज्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रेड पे विषयावर १ ऑगस्ट रोजी सविस्तर सादरीकरण ठेवलेले आहे. कायम प्रवास भत्याबाबत चर्चा करून वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवणे, एसएसडी परीक्षा फाईल अंतिम टप्प्यात असून लवकरात लवकर विषय निकाली काढणे, ग्राम महसूल अधिकारी ही फाईल साप्रवि कडे पाठवलेली असून मान्यता येताच, जीआर निर्गमित करणे, दुष्काळी अनुदानाच्या खचार्बाबत २०१७ पासूनचा खर्च थकबाकीसह देण्यात यावा, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या अधिवेशनातील मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मंडळ अधिकारी व अव्वल कारकून यांच्या पदसंख्येचा आढावा घेऊन प्रमाणात बदल करणे बाबत तात्काळ कार्यवाहीचे आदेश महसूल मंत्री यांनी दिले. नायब तहसीलदार पदाच्या परीक्षेसाठी तलाठ्यांना समाविष्ट करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून काही तांत्रिक निकषावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सचिवांनी सांगितले. यावेळी तलाठी व मंडळ अधिकारी यांना कॅशलेस सुविधा बाबत आरोग्य विभागाचा अभिप्राय घेऊन निर्णय घेतला जाईल.आदर्श तलाठी प्रमाणे आदर्श मंडळाधिकारी पुरस्कार देण्याचे मान्य करून त्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यासाठी सूचना दिल्या. नवीन सजांवर तसेच रिक्त कोतवालांची पदे भरण्याचे सचिवांनी मान्य केले.

तलाठ्यांसह सर्वांना साहित्य पुरविण्याचे आदेश

मदत व पुनर्वसन सचिवांशी चर्चा करून निर्णय घेणे, लॅपटॉप प्रिंटर बाबत तात्काळ जमाबंदी आयुक्त यांच्याशी चर्चा करून नवीन तलाठ्यांसह सर्वांना प्रिंटर स्कॅनर सह पुरविण्याचेआदेश महसूल मंत्री यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.