शिवद्रोही प्रशांत कोरडकरवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत इक्वालिटी फाउंडेशन व बी.एम.पी द्वारे टेंभुर्णी पोलीस स्टेशनला निवेदन
शिवद्रोही प्रशांत कोरडकरवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत इक्वालिटी फाउंडेशन व बी.एम.पी द्वारे टेंभुर्णी पोलीस स्टेशनला निवेदन
टेंभुर्णी (प्रतिनिधी) : कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ यांची बदनामी करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महापुरुष विरोधी प्रशांत कोरडकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपकजी पाटील साहेब यांना इक्वालिटी फाउंडेशन व बहुजन मुक्ती पार्टी यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना इक्वालिटी फाउंडेशन संस्थापक महावीरजी वजाळे, बहुजन मुक्ती पार्टी माढा लोकसभा अध्यक्ष महेंद्रजी सोनवणे, बहुजन मुक्ती पार्टी माढा लोकसभा प्रभारी प्रशांतजी गायकवाड, माणिकआबा किर्ते, गणेशजी खरात, नागनाथजी जगताप, राजवर्धनजी वजाळे, गौरवजी गाडे उपस्थित होते.
बहुजन समाजामधील सर्वच महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांमध्ये ब्राह्मण वर्गाचे लोक सतत अग्रेसर असतात अशा लोकांना भाजप सतत पोहोचण्याचे काम करत आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे. महापुरुष विरोधी प्रशांत कोरडकर याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असे महावीर वजाळे पोलीस निरीक्षक दीपकजी पाटील यांना निवेदन देताना भावना व्यक्त केली तसेच महत्वाची बाब म्हणजे महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांमध्ये केवळ आणि केवळ ब्राह्मण लोकच प्रत्येक वेळी का असतात यावरती बहुजन समाजामधील युवक कधी विचार करणार आहेत का नाही असा महेंद्रजी सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केला?