नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च नकार

- छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांची नाव कायम राहणार

0

नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च नकार

– छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांची नाव कायम राहणार

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने दिला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांची नाव कायम राहणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा या नावावर सर्वोच्च शिक्कामोर्तब झाला आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धाराशिव असे करण्यात आले होते. मात्र काही नागरिकांनी या निर्णयाला विरोध केला होता. या संदर्भात हस्तक्षेप करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने सरकारला दिलेला आहे. त्यामुळे त्यात हस्तक्षेप करण्यास काही अर्थ कारण नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवले आहे. नामांतर करण्याचा अधिकार हा कायद्याने सरकारला दिलेला आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने अलाहाबाद आणि औरंगाबाद हे दोन्ही प्रकरणे सारखी नसल्याचे म्हटले आहे.

या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय असल्याचे म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या नामांतरात हस्तक्षेप करण्यास माननीय सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे आणि याचिका फेटाळली आहे. हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेचा विजय आहे.

उच्च न्यायालयातील याचिकेवर निर्णय बाकी

औरंगाबादचे नामांतर सरकारने छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्याविरोधात काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मोहंमद हिशाम उस्मानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिका दाखल केली होती. हे प्रकरण अद्याप बोर्डावर आलेले नाही. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेली नाही. त्यामुळे नामांतर प्रकरणाची याचिका फेटाळली गेली अशा खोट्या बातम्या दाखवल्या जात असल्याचा दावा वकील एस. एस. काझी यांनी केला आहे.

नामांतरास एमआयएमचा विरोध

औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यास एमआयएम पक्षाने विरोध केला होता. तसेच या विरोधात न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी याप्रकरणी पुढाकार घेतला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे औरंगाबादचे नाव आता छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव कायम राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.