कोरोना लसीमुळे ३३ टक्के लोकांवर दुष्परिणाम झाल्याचे सर्वेक्षणातून समोर; 8% लोकांना हृदयविकाराचा झटका
कोरोना लसीमुळे ३३ टक्के लोकांवर दुष्परिणाम झाल्याचे सर्वेक्षणातून समोर; 8% लोकांना हृदयविकाराचा झटका
नवी दिल्ली : आज देशातील प्रत्येक तीनपैकी एका कुटुंबातील एक किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यांना आरोग्याशी संबंधित नव्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच मुळ कारण कोरोना लस असल्याचे एका मंडळाने केलेल्या पाहणी अहवालातून समोर आले आहे. यामध्ये 33% कुटुंबांना असे वाटते की, कोविड लस हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेडसावणाऱ्या नवीन आरोग्य समस्यांचे कारण असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. याशिवाय सरकारी डेटामध्ये, कोविड लसीकरणानंतर आढळून आलेल्या दुष्परिणामांमध्ये पांढ-या पेशी (प्लेटलेट्स) कमी होणे तसेच रक्त गोठणे यासारख्या समस्यांचा समावेश आहे.
8% लोकांना हृदयविकाराचा झटका
या सर्वेक्षणात कोविड लसीकरणाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना आलेल्या समस्यांनी लोकांनी सांगितल्या त्यातील 10% लोकांनी हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब कमी होणे आणि चक्कर येणे यासारख्या तक्रारी नोंदवल्या. त्याच वेळी 8% लोकांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचे समोर आले आहे. तसेच एवढ्याच लोकांनी सांगितले की, लसीकरणानंतर त्यांना ब्रेन स्ट्रोक किंवा आंशिक/पूर्ण पक्षाघात झाला आहे. कोविड लसीकरणाच्या दुष्परिणामांबद्दल जे लोक समोर येऊन बोलले त्यापैकी 77% लोकांनी यावेळी कबूल केले की, आम्ही Covishield ची AstraZeneca लस घेतली आहे. या दुष्परिणामामळे 2022 मध्ये बूस्टर डोस आला तेव्हा अनेक लोकांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे दिसले.
कोरोना लसीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम झाल्याचा डॉ. नाओमी वोल्फ यांच्या ‘फायझर पेपर्स’ चा निष्कर्ष
मागिल तीन वर्षांच्या काळात अकाली मृत्यूमुळे कोविड लसीला जबाबदार धरले जात असल्याने हे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी लोकांना खालीलप्रमाणे प्रश्न विचारण्यात आले होते.
प्रश्न: तुमच्या कुटुंबात असे कोणी आहे का की ज्यांच्या प्रकृतीच्या बिघडण्याला तुम्ही कोविड लस कारणीभूत मानता?
➤33% होय
➤67% नाही
प्रश्न: लसीकरणानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या समस्या येत आहेत?
➤2% किडनी निकामी
➤4% मायोकार्डियम किंवा हृदयाची जळजळ
➤4% कर्करोग (कॅन्सर)
➤6% छातीत दुखणे
➤6% रक्त गोठणे
➤8% हृदयविकाराचा झटका
➤8% मेंदूचा झटका/ पक्षाघात
➤हृदयाचे ठोके 10% वाढणे, रक्तदाब कमी होणे, डोके जड होणे.
➤8% इतर गंभीर आजार
प्रश्न: कोरोनाने बाधित झालेल्या लोकांनी कोणती कोविड लस घेतली?
➤77% कोविशील्ड
➤5% कोवॅक्सिन
➤5% स्पुतनिक
➤4% लोकांनी देशाबाहेर लस घेतली
➤9% सांगू शकत नाही
बरोबर लिहिले आहे.अगदी तरुणांना पण हार्ट अॅटकच्या त्रासापासून सुटका मिळाली नाही.हे सिध्द होते आहे.
यात जास्तीत जास्त सामान्य माणूसच बळी जात आहे.कोणताही राजकारणी वा सेलिब्रिटी मृत्यू झाला आहे का?