अटलांटिक महासागरात बोट बुडाली

६ मच्छिमारांचा मृत्यू तर ७ जण बेपत्ता

0

अटलांटिक महासागरात बोट बुडाली

६ मच्छिमारांचा मृत्यू तर ७ जण बेपत्ता

नवी दिल्ली : दक्षिण अटलांटिक महासागरात एक मासेमारी बोट बुडाली आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून सात जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे. फॉकलंड बेटांच्या किनाऱ्यांपासून सुमारे २०० मीटर अंतरावर मंगळवारी हा अपघात झाला. ब्रिटिश आणि स्पॅनिश सागरी अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बोटीत एकूण २७ लोक होते. सर्वजण समुद्रात मासे पकडण्यासाठी जात होते. दरम्यान, फॉकलंड बेटांच्या किनाºयापासून सुमारे २०० मैल दूर बोट बुडाली.

यावेळी स्पेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अर्गोस जॉर्जिया नावाचे जहाज अर्जेंटिनाजवळ दक्षिण अटलांटिक महासागरात बुडाले. त्यांनी सांगितले की जहाज १७६ फूट लांब होते. या दुर्घटनेनंतर परिसरात मासेमारी करणाºया मच्छिमारांनी आपल्या बोटीसह १४ जणांचे प्राण वाचवले. आग्नेय गॅलिसियामधील स्पेनच्या पोन्टेवेद्रा प्रांतातील अधिकाऱ्यांनी १० क्रू सदस्यांना स्पॅनियार्ड म्हणून ओळखले, क्रू मेंबर्सपैकी बरेच जण इतर देशांतीलही होते.
Leave A Reply

Your email address will not be published.