तिरंगा ध्वज स्वातंत्र्याचे प्रतिक – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रतिपादन

0

तिरंगा ध्वज स्वातंत्र्याचे प्रतिक – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

– जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे प्रतिपादन

छत्रपती संभाजीनगर : स्वातंत्र्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, ज्यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले. त्यांच्यामुळे स्वातंत्र्या मिळाले. तिरंगा ध्वज हा आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. त्यांचे स्मरण करणे आपले आद्यकर्तव्य असून त्यासाठीच हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यात सहभागी होणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्त सर्व अधिकारी कर्मचाºयांना तिरंगा ध्वज वितरीत करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी स्वामी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी खिरोळकर, उपजिल्हाधिकारी मुळे, उपजिल्हाधिकारी बंगाळे, डॉ. सुचता शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी वायाळ आदी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, प्रत्येकाने देश हा सर्वतोपरी मानून देशाप्रति आपले कर्तव्य बजावण्यास प्राधान्य द्यायला हवे. आज आपण उपभोगत असलेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले न लाखो लोकांनी त्यासाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळे आपण हे स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्यामुळे या बलिदानाची आठवण ठेवून ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वितरण

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज सकाळी सर्व अधिकारी कर्मचारी यांना राष्ट्रध्वज वितरण करण्यात आले. यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरम, हर घर तिरंगा अशा घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी नियोजन सभागृहात संबोधित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.