भाजपच्या फुलंब्री विधानसभा इच्छुकांमध्ये दोन गट पडल्याची चर्चा
राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा सत्कार
छत्रपती संभाजीनगर : विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल झाल्यानंतर शहरातील एका मंगल कार्यालयात त्यांचा सत्कार झाला. या वेळी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी या सत्कार सोहळ्यावर फुलंब्री मतदारसंघातून इच्छुक असलेल्या सात जणांनी ताबा मिळवला. या प्रत्येकाने राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.
भाजपच्या फुलंब्री विधानसभा इच्छुकांमध्ये दोन गट पडल्याची चर्चा: या कार्यक्रमाचे नियोजन सात जणांनी केल्यामुळे इतर इच्छुकांना व्यासपीठावर प्रवेश करणार नाही याचेही व्यवस्थापन केले होते. कार्यक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया या सात पदाधिकाºयांना बोलण्याची संधी होती. यावेळी प्रत्येकाने राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. प्रत्येक जण भाषण करताना जास्त बोलायला लागला की व्यासपीठावरील इतर इच्छुक मागून भाषण आटोपते घेण्याचा इशारा करीत होते. या कार्यक्रमात भाजपच्या फुलंब्री विधानसभा इच्छुकांमध्ये दोन गट पडल्याची चर्चा होती. एक गट व्यासपीठावर, तर दुसरा गट खाली बसलेला दिसत असल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.
उमेदवारीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे इच्छुकांची गर्दी
केज शहरातील रस्त्याची दयनीय अवस्था
सोनपेठची भारतीय स्टेट बँकचा कारभार शाखाधिकाऱ्याविनाच
कुणाचाच द्वेष केला नाही
पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडल्याचे बागडे यांनी सांगून सार्वजनिक जीवनात विरोधक असो की स्वकीय, कुणाचाच द्वेष केला नाही, असे सत्काराला उत्तर देताना सांगितले. १९९२ मध्ये मुरली मनोहर जोशींच्या एकता यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क आला. विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर गाठीभेटी वाढल्याचे सांगितले.
नजर आमच्यावर ठेवा
पूर्वी पक्षातील कार्यकर्त्यांना सहा दिवस प्रशिक्षण दिले जायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेई, गोविंदाचार्य आदींचा प्रशिक्षण देणाºयांमध्ये समावेश होता. आता राजकारणाचा ट्रेंड बदलला. हरिभाऊ राजस्थानमध्ये असले तरी त्यांनी एक नजर आमच्यावर ठेवावी, अशी अपेक्षा रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.