राजस्थानमधील 100 रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

-लखा टेररिस्ट चिंग अँड कल्टिस्ट नावाने आलेल्या मेलमुळे खळबळ

0

राजस्थानमधील 100 रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

-लखा टेररिस्ट चिंग अँड कल्टिस्ट नावाने आलेल्या मेलमुळे खळबळ

जयपूर : येथील मोनिलेक आणि सीके बिर्लासह राजस्थानमधील १०० हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आलेल्या या मेलने रुग्णालय व्यवस्थापनाला धक्का बसला. या मेलमध्ये लिहिले आहे की, हॉस्पिटलच्या बेडखाली आणि बाथरूममध्ये बॉम्ब आहे. रुग्णालयामध्ये असलेल्या प्रत्येकाला मारले जाईल. यामुळे सर्वत्र रक्त असेल. तुम्ही सर्व मृत्यूला पात्र आहात, असे म्हटले. या मेल पाठवणाºया व्यक्तीने स्वत:ची ओळख लखा टेररिस्ट चिंग अँड कल्टिस्ट अशी केली आहे.

राजस्थानमधील 100 रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी: लखा टेररिस्ट चिंग अँड कल्टिस्ट अशी ओळख असलेल्या मेलवरून जयपूरमधील डझनहून अधिक रुग्णालयांना अशा धमक्या आल्या आहेत. धमकी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत शोध सुरू केला. यामध्ये मोनिलेक हॉस्पिटल सेक्टर ४, जवाहर नगर (जयपूर) येथे आहे. गोपाळपुरा वळणावर (जयपूर) त्रिवेणी उड्डाणपुलाजवळ शांती नगरमध्ये सीके बिर्ला रुग्णालय आहे. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त कायदा व सुव्यवस्था कुंवर राष्ट्रदीप म्हणाले, रुग्णालयांकडून नुकतीच माहिती मिळाली आहे. त्यानंतर एटीएस आणि बॉम्बशोधक पथकाचे अधिकारी पाठवण्यात आले. दोन्ही रुग्णालयांमध्ये शोध सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तू सापडलेली नाही.

रविवारी सकाळी ८.३० वाजता पोलिसांना मोनिलेक हॉस्पिटलमधून मेलची माहिती मिळाली. ८.४५ च्या सुमारास पोलिसांचे पथक मोनिलेक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यानंतर एटीएस, इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आणि बॉम्ब निकामी पथकाने शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान रात्री ९ वाजता सीके बिर्ला यांच्याकडूनही माहिती मिळाली. यानंतर मोनिलेक हॉस्पिटलमधील ईआरटी टीम सकाळी १०.३० वाजता सीके बिर्ला हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर येथेही शोध घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.