उंडणगावात आईच्या सन्मानासाठी वृक्षारोपण
-ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आनोखा उपक्रम
सिल्लोड : तालुक्यातील उंडणगाव येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून पर्यावरण व वृक्षसंवर्धन तसेच आईचा सन्मान ठेवण्यासाठी ग्रामपंचायत पुढे सरसावली आहे. यावेळी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावात आईच्या नावाने झाड लावून ते जगवावे. आईच्या नावे एक झाड ही वेगळी संकल्पना ग्रामपंचायतीतर्फे राबवण्यात येते आहे. आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सहाशेहून अधिक झाडे गाव परिसरात लावण्यात आलेली आहेत.
मराठवाड्यासाठी कोकणातून पहिल्या टप्प्यात ५५ टीएमसी पाणी देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
नव्या संसद भवनच्या इमारतीला गळती
शहर स्वच्छ बनविण्यासाठी माझा कचरा माझी जबाबदारी मोहिम
केज तालुक्यात अनेक प्रकल्प व तलाव मृत साठ्यात
उंडणगाव गावातून जाणाऱ्या देवीसमोरील मार्गावर बाजारपेठेतून जाणाºया रस्त्यावर तीन ते चार वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीच्या मदतीने वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम हाती घेतली. पंकज जैस्वाल यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. तेव्हाचे अशोका व गुलमोहराचे झाड आज सावली देत आहे. आईचे स्थान ज्या त्या कुटुंबासाठी महत्त्वाचे, नव्हे आस्थेचे व खूप जिव्हाळ्याचे असते. त्यातूनच एक झाड आईसाठी ही संकल्पना पुढे आली. त्यासाठी झाडे लावण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे ६०० झाडे लावण्यात आली आहेत. आपली आई या जगात नसली तरी या झाडाच्या रूपाने ती सदैव आपल्या नजरेसमोर राहील हा यामागचा उद्देश आहे.
आईचा नावे एक झाड संकल्पना चांगली
वृक्षारोपण: यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने वृक्ष प्रभातफेरी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत मार्फत आईचा नावे एक झाड ही संकल्पना खुप चांगली असून आईच महत्व माणसाच्या जीवनात खूप अमूल्य असून आईचा नावे वृक्ष लागवड करून आपुलकीने त्याचे संगोपन केल्या जाईल व वृक्ष लागवडीस चांगली चालणा मिळेल, असे अशोक सावळे म्हणाले.
आईची आठवण म्हणून संगोपन करा
सहभागी व्हा, संगोपनासाठी सहकार्य ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोपे उपलब्ध करण्यात येणार असून तीन ते चार फूट उंचीचे झाडाचे कलम नागरिकांनी आपल्या घरासमोर किंवा शेतात लावून त्या भोवती संरक्षणासाठी जाळी लावावी. त्यावर आपल्या आईचा नामोल्लेख करण्यात येणार व ते झाड आपली आईची आठवण म्हणून त्याचे संगोपन करावे. सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येऊन त्याचे संगोपन ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणार आहे, असे सरपंच लक्ष्मण पाटील म्हणााले.