जपानमध्ये एम्पिल चक्रीवादळाचा तडाखा – वेग ताशी २१६ किमी

- पूर्व भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचे प्रशासनाचे आदेश

0

जपानमध्ये एम्पिल चक्रीवादळाचा तडाखा – वेग ताशी २१६ किमी

– पूर्व भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचे प्रशासनाचे आदेश

– पूर्व भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचे प्रशासनाचे आदेश

टोकिओ : एम्पिल हे चक्रीवादळ शुक्रवारी संध्याकाळी जपानच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले आहे. जपानच्या हवामान संस्थेने हे वादळ शक्तिशाली आणि धोकादायक असल्याचे सांगितले आहे. या वादळामुळे राजधानी टोकियोसह अनेक पूर्वेकडील भागात जोरदार पाऊस आणि जोरदार वारे वाहत असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय प्रशासनाने पूर्व भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. हे वादळ ताशी २१६ किमी वेगाने वाहत असल्याचे सांगितले जात आहे.

एम्पिल या वादळाच्या इशाºयानंतर प्रशासनाने सुरक्षेसाठी अनेक पावले उचलली आहेत. यामध्ये इवाकी शहरातील सुमारे ३२३,००० लोकांना आणि कुशिमा प्रांतातील मोबारा शहरातील १८,५०० लोकांना बाहेर जाण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय इतर अनेक शहरांतील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे टोकियो आणि नागोया दरम्यानच्या सर्व हायस्पीड बुलेट ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

जपानमध्ये मे ते नोव्हेंबर या महिन्यांला टायफून सीझन म्हणतात. या काळात सुमारे २० वादळे येतात. यामुळे अतिवृष्टी, भूस्खलन आणि पूर येतो. मात्र या वादळामुळे वाहतूक व्यवस्था खोळंबली असल्याने जपान एअरलाइन्स २८१ देशांतर्गत आणि ३८ आंतरराष्ट्रीय उड्डाणे देखील रद्द करणार आहेत. त्यामुळे १ लाखाहून अधिक प्रवाशांना फटका बसणार आहे. वादळाच्या हंगामातही आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक वादळे येतात. एम्पिल वादळ हे वर्षातील सातवे वादळ आहे.

समुद्राच्या बाजूला जोरदार बर्फवृष्टी

जपानला मोसमी वादळांचा सामना करावा लागतो. बेटाच्या समुद्राच्या बाजूला जोरदार बर्फवृष्टी आणि मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच जपानची भूमि ही खडबडीत आहे आणि त्यात अनेक उंच उतार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.