तैवान आणि फिलीपिन्समध्ये जेमी वादळाचा तडाखा
-२५ हून अधिक लोकांचा मृत्यू, ३८० हून अधिक जण
नवी दिल्ली : तैवान आणि फिलीपिन्समध्ये जेमी वादळाचा तडाखा बसला असून यामध्ये गुरूवारी २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून ३८० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यामुळे तैवानमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.फिलीपिन्समध्ये भूस्खलन आणि पुरामुळे २२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
मागील आठवडाभरापासून या दोन्ही देशांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने तैवानमधील अनेक शहरांची वीजही गेली आहे. पुढील आदेश येईपर्यंत तेथील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.
जेमी वादळाचा चीनमध्येही परिणाम
जेमी वादळाचा परिणाम चीनमध्येही दिसून येत आहे. फुजियान प्रांतातील उड्डाणे आणि गाड्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.