“फडतूस” शब्द कमळाबाईच्या आरपार घुसला  – उद्धव ठाकरे

0 182

“फडतूस” शब्द कमळाबाईच्या आरपार घुसला  – उद्धव ठाकरे

 

News Update: महाराष्ट्रात सत्ताधारी भाजपा-शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला नेत्याला मारहाण झाल्यानंतर यावर जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. दुसरीकडे भाजपाने सावरकर यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी आणि विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरेंनी “महाराष्ट्राला फडतूस गृहमंत्री लाभला आहे”, असं म्हणत केलेली टीका सध्या राजकारणाचा मुद्दा ठरली आहे. यावरून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर चिखलफेक चालू असताना सामना अग्रलेखातून ठाकरे गटानं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला लक्ष्य केलं आहे.

“राज्य सरकार किंवा ते चालवणारे फडतूस आहेत असे फक्त लोकांनाच वाटत नाही, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयासही वाटते. महाराष्ट्राचे सरकार ‘नपुंसक’ आहे म्हणजेच बिनकामाचे आहे, असे जर सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे, तर मग भाजपच्या चवन्न्या आणि ‘बावन’ आण्यांना इतका थयथयाट करण्याचे कारण काय? ‘नपुंसक’ किंवा ‘फडतूस’ शब्दांचा अर्थ या ‘बावन’ आण्यांनी समजून घेतला पाहिजे. शब्दकोश म्हणतो, ‘बिनकामाचे, निरर्थक म्हणजे फडतूस,’ पण ‘फडतूस’ शब्द कमळाबाईच्या आरपार घुसला”,“राज्याचे काडतूस गृहमंत्री फडतूस भाषेत आरोळी ठोकतात, “मी काडतूस आहे, हम घुसेंगे”. साहेब, किधर घुसेंगे ? एकदा काय ते स्पष्ट करा. तिकडे चीन अरुणाचलमध्ये एकदम आतमध्ये घुसला आहे. ११ गावांची नावे चीनने परस्पर बदलली. तरीही तुमचे भीमपराक्रमी पंतप्रधान चीनचे नाव घेऊन इशारा द्यायलाही तयार नाहीत. पाकिस्तानला पोकळ धमक्या दिल्या जात आहेत, पण आत घुसलेल्या चीनचे काय? चीनचे जे काडतूस आत घुसले आहे ते आधी तुमच्या त्या ‘बावन’ आण्यांना काढायला सांगा”, “मुळात हाताशी केंद्रीय यंत्रणा नसतील तर तुम्ही कोण ? तुमचे कर्तृत्व काय  ? तुम्ही तुमच्या पायावर तरी उभे राहू शकाल काय ? तुमच्या काडतुसाची दारू ही त्या केंद्रीय यंत्रणांची आहे. नाहीतर तुम्ही सगळे एकजात पाद्रे पावटेच आहात”, असाही टोला ठाकरे गटानं अग्रलेखात लगावला आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.