उद्धव ठाकरे म्हणजे पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना

मनसे नेते प्रकाश महाजन यांचे उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र

0

उद्धव ठाकरे म्हणजे पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना

-मनसे नेते प्रकाश महाजन यांचे उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र

छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यात चांगलेच वाकयुध्द सुरू आहे. यावेळी प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांची तुलना पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांच्याशी केली होती. त्याला चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर महाजन यांनी पुन्हा एकदा खैरे यांच्यावर हल्ला चढवत त्यांना जसच्या तसं प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत खैरे यांचा निवडणुकीत खर्च झाला आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे म्हणत महाजन यांनी हल्ला चढवला आहे.

महसूल कर्मचाºयांच्या आंदोलनामुळे कामे खोळंबली
नेत्यांच्या कंबरेला मिठ्या मारणा-यांना हार्प काय घंटा समजणार?

मनसे नेते प्रकाश महाजन हे माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी ते म्हणाले की, चंद्रकांत खैरे हे देव भोळे आहेत. सतत दोन वेळा झालेला पराभव, पक्षात कमी होत चाललेली पत आणि दोन लोकसभेच्या निवडणुकीत खर्च झाल्याने त्याचा परिणाम त्यांच्या खिशावर झाला. त्याचा परिणाम कमरेवर होण्यापेक्षा डोक्यावर जास्त झाला. ग्रामीण भागात अशा लोकांना गीण्यात गेलेले लोक अस म्हणतात, असा हल्लाच प्रकाश महाजन यांनी चढवला आहे. यावेळी ते मी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली म्हणून ते माझ्यावर चिडले नसतील. ते उलट त्यांच्याच नेत्यावर चिडले असतील. खैरे हे कट्टर शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते आपल्याच नेत्यावर चिडले असावेत, असा चिमटा महाजन यांनी काढला.

अंगार कोण अन् भंगार कोण ?
देशद्रोहाचा खरा चेहरा…!

आरक्षणाचा तिढा सोडवायला हवा

मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण सोडून चांगलं काम केलं आहे. कारण उपोषण केल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. कोणत्याही आंदोलनाला शंभर टक्के यश येत असं नाही. काही मागण्या पूर्ण होतात, काही मागण्या मागे राहतात. त्यामुळे राहिलेल्या मागण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हीच आंदोलनाची दिशा असते. ओबीसी आणि मराठा समाजातील विचारवंत लोकांनी एकत्र येऊन हा आरक्षणाचा तिढा सोडवायला हवा, असं ते म्हणाले.

विरोध करा अन्यथा निरोध होईल !

Leave A Reply

Your email address will not be published.