माळशिरस तालुक्यातील पानीव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रोहिणी राहुल बाबार पाटील यांची बिनविरोध निवड

0

माळशिरस तालुक्यातील पानीव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रोहिणी राहुल बाबार पाटील यांची बिनविरोध निवड

टेंभूर्णी (महेंद्र सोनवणे) : माळशिरस तालुक्यात २०२२ मध्ये झालेल्या पानीव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदी सौ लता मोहन कांबळे यांची जनतेतुन निवड झाल्यानंतर उपसरपंच पदी सौ. पुनम राजकुमार गुरव यांची एकमताने निवड झाली होती ठरल्याप्रमाणे त्यांचा कार्यकाळ संपल्यावर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेवर सौ. रोहिणी बाबार पाटील यांची निवड करण्यात आल्याची घोषणा निर्णय अधीकारी श्रीमती एन.आर.शेख यांनी केली.

नवनिर्वाचित उपसरपंच सै रोहीणी राहुल बाबर पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केल्यानंतर श्रीराम शिक्षण संस्थेचे सहसचिव मा. करण (भैय्या) पाटील यांनी त्याचा सत्कार केला यावेळेस उपस्थित ग्रामपंचायत सदस्य सौ पमाबाई पवळे सौ रोहिणी संतोष बाबार सौ कोमल खवळे श्रीमती रोहिणी शिंदे सौ पुनम राजकुमार गुरव सौ जयश्री शिंदे ग्रामपंचायत अधिकारी एन .आर. शेख मॅडम ग्रामपंचायत कर्मचारी धनराज खवळे दिनेश बनकर पोपट गुरव हाजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.