पोलीस कस्टडीत पठाणच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फ करा संभाजी ब्रिगेडसह वंचित बहुजन आघाडीची मागणी

0 251

पोलीस कस्टडीत पठाणच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून बडतर्फ करा संभाजी ब्रिगेडसह वंचित बहुजन आघाडीची मागणी

 

परळी (वार्ताहर) : मंगळवार दिनांक 13 जून रोजी परळी शहरातील शहर पोलीस स्टेशन मध्ये एका व्यक्तीचा पोलीस मारहाणी दरम्यान मृत्यू झाला. याला जबाबदार असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर 302 गुन्हा दाखल करून तात्काळ त्यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे एमआयएम, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.परळी शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी पोलीस अधीक्षक यांनी कायम पुढाकार घेऊन विशेष लक्ष द्यावे.अशी मागणी सुद्धा याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली असून या गंभीर स्वरूपाच्या घटनेमुळे परळी शहरांमध्ये सध्या भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.लोकांच्या मनातील भीती काढून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेऊन पोलीस प्रशासनाने काम करावे अशी मागणी सुद्धा याप्रसंगी करण्यात आली. एम आय एम, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना उत्तर देताना पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट केले की या प्रकरणाची चौकशी व हे प्रकरण सीआयडी कडे वर्ग करण्यात आले आहे.तपासाचे सर्व अधिकार त्यांच्याकडे असून तपास पूर्णपणे निपक्षपाती होईल.पोलीस आणि सीआयडी पूर्ण निपक्ष पद्धतीने काम करून या प्रकरणाला योग्य न्याय देऊन जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर योग्य कारवाई होईल.असे आश्वासन चर्चेदरम्यान पोलीस अधीक्षक यांनी दिले.याप्रसंगी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देताना एमआएम चे बीड जिल्हाध्यक्ष शेख शफिक भाऊ, संभाजी ब्रिगेड बीड जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष देवराव लुगडे महाराज, वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्नजीत रोडे, एम आय एम चे बीड जिल्हा प्रवक्ता रमीस सर, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष गौतम साळवे, एमआयएम माजी नगरसेवक ताज खान पठाण, वंचित बहुजन आघाडी युवा तालुका अध्यक्ष राजेश सरवदे, वंचित बहुजन आघाडी युवा तालुका महासचिव ज्ञानेश्वर गीते, युवा उपाध्यक्ष अविनाश मुंडे, युवक नेते फिरोज खान जनाब, ओबीसी नेते मुस्तफा, भाई कादर कुरेशी, एजाज शेख, लालू भैय्या, अन्वर शेख, शेख उमर यासह एम आय एम वंचित बहुजन आघाडी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.