मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेच्या मराठवाडा संघटक पदी विजयकुमार सितळे यांची निवड

0

मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेच्या मराठवाडा संघटक पदी विजयकुमार सितळे यांची निवड

जालना : मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष परमेश्वर गरबडे यांनी नांदेड येथील दैनिक नेता नगरीचे संपादक विजयकुमार सितळे यांची मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषदेच्या मराठवाडा संघटक पदी निवड केली व निविडिचे पत्र श्री श्री श्री महंत राम भारती गुरु महाराज नांदेड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की,नुकतीच शिवाजीनगर जालना येथे मराठी, हिंदी, उर्दू पत्रकार परिषदेचे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गरबडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड येथील श्री महंत राम बापू भारती महाराज हे होते. यावेळी मराठी हिंदी उर्दू पत्रकार परिषद संघटनेच्या वाढीविषयी चर्चा झाली.

पत्रकार बांधवांना न्याय देण्यासाठी तसेच पत्रकार संघटनेच्या प्रचार प्रसार करून मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षांची निवड करून पत्रकारांना न्याय देण्याचे काम कराण्यासाठी विजयकुमार सितळे यांची निवड करण्यात येत असल्याचे  यावेळी परिषदेचे अध्यक्ष गरबडे यांनी सांगितले.  यावेळी राम बापू महाराज यांच्या हस्ते निवडीचे पत्र सितळे यांना देण्यात आले.
यावेळी शुभम पांचाळ, भागवत पाटील,प्रकाश पाटील, कांबळे पवार आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.