कुस्तीत अंतिम फेरी गाठणारी विनेश पहिली भारतीय
-पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विनेश फोगटचे कौतुक
नवी दिल्ली : कुस्तीपटू विनेश फोगटचे १०० ग्रॅम वजन वाढल्याने ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरली. तिने कुस्तीत अंतिम फेरी गाठली होती. त्याचवेळी तिच्या वजनात वाढ झाल्याने ती अपात्र ठरली गेली. विनेश ही हरियाणा राज्यातील असुन विनेशचे सासरचे घर सोनीपत येथे आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कुस्तीत अंतिम फेरी गाठणारी विनेश पहिली भारतीय ठरली. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमधून मायदेशी परतलेल्या खेळाडूंशी संवाद साधतानाांतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेशचे कौतुक केले. मात्र यावेळी विनेश फोगट हजर नव्हती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय तुकडीने गुरुवारी मोदींची भेट घेतली. यावेळी भारताने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १ रौप्य आणि ५ कांस्य पदके जिंकली आहेत. या भेटीत पंतप्रधान मोदींनी सर्व खेळाडूंचे कौतुक करीत त्यांच्याशी संवाद साधला.
जपानमध्ये एम्पिल चक्रीवादळाचा तडाखा – वेग ताशी २१६ किमी
जरांगे फॅक्टर रोखण्यासाठी लाडकी बहीण योजना जन्माला घातली
महंत रामगिरी महाराजावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
विनेश फोगटने ५० किलो वजनी गटात एका दिवसात ३ सामने खेळले. प्री-क्वार्टर फायनलमध्ये तिने टोकियो ऑलिम्पिक चॅम्पियन युई सुसाकीचा पराभव केला. तिने उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या पैलवानाचा तर उपांत्य फेरीत क्युबाच्या कुस्तीपटूचा पराभव केला. अंतिम फेरी गाठणारी विनेश पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. यामुळे देशभरातून तिचे कौतुक केले जात आहे. ती आज दिल्ली विमातळावर येणार असून ती आपल्या गावी जाताना अनेक ठिकाणी सत्कार स्विकारणार आहे.
विनेश आज दिल्ली विमानतळावर उतरणार
विनेश फोगट ही सध्या पॅरिसमध्ये असून ती उद्या म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता दिल्ली विमानतळावर उतरणार असून त्यानंतर ती प्रथम चरखी दादरी येथील बलाली या तिच्या गावी जाणार आहे. यावेळी जाताना वाटेत ती अनेक ठिकाणी स्वागत स्विकारणार आहे. विनेशचा भाऊ हरविंदर फोगट यानेही याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले आहे.