विनेशच्या सपोर्ट स्टाफची चौकशी जाणार
नवी दिल्ली : भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगाटसह कोट्यावधी भारतीयांनी पाहिलेल्या गोल्डन स्वप्नांचा चुरडा झाला. वजन मर्यादेत न बसल्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये गोल्ड जिंकण्यासाठी सज्ज झालेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र म्हणून घोषित करण्यात आलं. विनेश अपात्र ठरल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तिच्या वाढलेल्या वजनावर, तिच्यावर एवढंच नाहीतर तिच्या सपोर्ट स्टाफवरही. अपात्र ठरवण्यात आल्याचा निर्णय आल्यानंतर एकच गदारोळ झाला. यामुळे आता विनेशच्या सपोर्ट स्टाफची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हे पण वाचा
दाक्षिणात्य अभिनेत्री मृणाल ठाकूर विराट कोहलीबाबत काय म्हणाली?
राज्यात होमगार्ड भरती सुरु, जाणून घ्या कागदपत्रे, पात्रता व अटी
विनेश फोगाटची CAS (Court of Arbitration for Sports) मध्ये धाव
दाक्षिणात्य अभिनेत्री मृणाल ठाकूर विराट कोहलीबाबत काय म्हणाली?
राज्यात होमगार्ड भरती सुरु, जाणून घ्या कागदपत्रे, पात्रता व अटी
विनेश फोगाटची CAS (Court of Arbitration for Sports) मध्ये धाव
कुस्तीपट्टु विनेशचं वजन मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त झाल्याने तिला अपात्र ठरविल्यानंतर तिला अंतिम सामना खेळता न आल्याने गोल्ड मेडल मिळविण्याचे तिचे स्वप्न धुळीला मिळाले. विनेशला अपात्र ठरल्यानंतर आता तिची उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी क्युबाच्या युस्नेलिस गुझमनला अंतिम फेरीत स्थान देण्यात आलं आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी विनेश फोगाटचं वजन सुमारे ४९.९ किलो होतं, परंतु सहसा तिचं वजन ५७ किलो असतं, त्यामुळे तिला वजन मर्यादेत राहण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
विनेश फोगाटचा सपोर्ट स्टाफ वजनावर लक्ष ठेवण्यासाठी अपयशी का ठरला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तिची काळजी घेण्यासाठी प्रसिद्ध हंगेरियन प्रशिक्षक वोलार अकोस आणि फिजिओ अश्विनी जीवन पाटील यांच्यासह वैयक्तिक कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी तिचं वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण शक्य झालं नसल्याचे सांगितले जात आहे.
उपांत्य फेरीनंतर तिचं वजन अंदाजे ५२.७ किलो होतं. तिनं कोणताही ब्रेक न घेता, खाणं-पिणं न करता सतत वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. सकाळपर्यंत तिचं वजन ५०.१ वर आणण्यात विनेश फोगटला यश आलं. मात्र वजन कमी करण्यासाठी तिला अधिकचा वेळ मिळाला नसल्याने तिला अपात्रेचा सामना करावा लागला असे सांगितले जात आहे.