पावसाळा लहानापासून ते वृद्ध सर्वाना आवडतो. पावसाळ्यात आपण उत्साही, ताजेतवाने, आरामदायक आणि आनंदी असतो. या पावसाच्या थंड गारव्यात गरम गरम चहा आणि भजे खायला कोणाला नाही आवडत? मात्र हाच पावसाळा डेंग्यू, मलेरीया सारखे अनेक आजारही घेऊन येतो.

Image by: Pixabay

१. पावसात भिजणे टाळा

बाहेर जाताना कितीही वातावरण स्वच्छ असले तरी छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवा. पावसात भिजण्यापासून आणि आजारी पडण्यापासून स्वतःचे संरक्षण करा.

Image by: Pixabay

२. बाहेरील खाद्य टाळा 

रस्त्यावर विकले जाणारे उघड्यावरील खाद्यपदार्थ किंवा कापलेली फळे हे हानिकारक सूक्ष्मजीवांचे,  संक्रमण आणि रोगांचे मुख्य केंद्र आहेत.

Image by: Pixabay

३. पाणी उकळलेले आणि स्वच्छ प्या

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी हायड्रेटेड राहा. उकळलेल्या किंवा फिल्टर केलेल्या पाण्याची बाटली सोबत ठेवा. बाहेरील थंड पाणी किंवा पेयेमुळे व्हायरल इन्फेक्शन होऊ शकते.

Image by: Pixabay

४. सुरक्षित सामाजिक अंतर राखा

लोकांना भेटताना किंवा प्रवासादरम्यान स्वतःला आणि इतरांना फ्लू आणि सर्दी या संसर्ग पसरवण्यापासून वाचवण्यासाठी सामाजिक अंतर ठेवा.

Image by: Pixabay

5. हात स्वच्छ ठेवा 

पावसाळ्यात ओल्या वातावरणात जंतूंचा प्रसार अधिक वेगाने होतो. व्हायरल इन्फेक्शन होऊ नये यासाठी खाद्य वस्तूंना हाताळ्ण्याआधी, जेवणापूर्वी आणि नंतर स्वच्छ हात धुवा.

Image by: Pixabay

६. प्रतिकारशक्ती वाढवा

पावसाळ्यात नाचायला, फिरायला, रस्त्यावरचे पदार्थ  खायला आवडते यातून ताजेतवाने आणि चैतन्यशील वाटते, परंतु यामुळे विषाणूजन्य संसर्ग, पोटाच्या समस्या, ताप आणि फ्लूचा त्रास होतो. म्हणून प्रतिकारशक्ती वाढविणारी व्हिटॅमिन ‘सी’ युक्त हिरव्या भाज्या, संत्री आणि अंकुर असलेले कडधान्ये आहारात घ्या.

Image by: Pixabay

७. प्रोबायोटिक्सचे अधिक सेवन करा

रोजच्या आहारात दही, ताक आणि लोणचे इत्यादी प्रोबायोटिक पदार्थ घ्यावे. प्रोबायोटिक्स हे (Good Bacteria) रक्षक सूक्ष्मजीव आहेत जे तुमच्या आतड्यांच्या आरोग्याला चालना देतात आणि पोटाच्या संसर्गापासून लढण्यासाठी तुमची पाचक प्रणाली तयार करतात.

Image by: Pixabay

८. साचलेले पाणी काढून टाका

उघड्यावर पाणी साठणे आणि घराभोवती साचलेले पाणी हे रोग पसरवणाऱ्या कीटकांचे आणि डेंगू, मलेरियाच्या डासांची पैदासचे केंद्र आहे. म्हणून, पिण्याच्या पाण्याची भांडी झाकून ठेवा. रस्त्यावरील नाले, तुंबलेल्या किंवा साचलेल्या पाण्याचा स्रोत काढून टाका.

Image by: Pixabay

9. डासांपासून सावध राहा

विषाणूजन्य संसर्गाचा प्रसार केवळ साचलेले पाणी साफ करून संपत नाही. जेव्हा तुम्ही घराबाहेर असता तेव्हा मच्छर fabric roll on लावून निघा. घरी असतानाही मच्छरदाणी आणि रेपेलेंट्स वापरा. तब्येत खराब असल्यास, नियमित आरोग्य तपासणीसाठी जा.

Image by: Pixabay

10. पुरेशी झोप घ्या

अवेळी झोपण्याच्या पद्धतींमुळे प्रतिकारशक्ती बिघडते आणि पावसाळ्यात फ्लू आणि सर्दी यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. रात्री उशिरापर्यंत काम करणे आणि जागणे टाळा. निरोगी राहण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दररोज रात्री 6 ते 8 तास झोपेची गरज आहे.

Image by: Pixabay

11. नियमित व्यायाम करा

शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे आणि नियमित व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते, हृदय गती नियंत्रित राहते, श्वासोच्छवासाची समस्या सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते. पाऊस सुरु असताना घरातही व्यायाम करू शकता.

Image by: Pixabay