मिटकरी हे काय टेलिफोन आॅपरेटर आहेत का? – खासदार बजरंग सोनवणे यांचेकडून मिटकरींचा समाचार

0 30

मिटकरी हे काय टेलिफोन आॅपरेटर आहेत का?

– खासदार बजरंग सोनवणे यांचेकडून मिटकरींचा समाचार

बीड : जिल्ह्यातील जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले आहे. पण मी शरद पवार साहेबांना सोडले तर पब्लिक मला मारेलच, पण बायकोही नाश्ता द्यायची नाही, अशी मिश्कील टिप्पणी बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. अमोल मिटकरी यांनी मंगळवारी बजरंग बप्पा हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र बजरंग सोनवणे यांनी हे सर्व आरोप नाकारले नाकारत अजित पवार यांच्या बंगल्यावर कोणाचे कॉल येतात, हे समजायला अमोल मिटकरी हे काय टेलिफोन आॅपरेटर आहेत का? असा सवाल करून अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
यावेही बजरंग सोनवणे म्हणाले की, अजितदादांच्या बंगल्यावर कोणाचे कॉल येतात, याची माहिती त्यांच्या टेलीफोन आॅपरेटरकडेच असू शकते. कुणाला काय राजकारण करायचं ते करुद्या, त्याला काय उत्तर द्यायचं, ते मी बघेन. शरद पवारांची ताकद महाराष्ट्रच काय, तर अख्ख्या देशाने पाहिली आहे, ती पचवता येत नसल्याने संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. शरद पवार साहेबांचे आठ खासदार राज्यभरात निवडून आले आहेत. माझ्यासारखा एखादा आमदार इतर कोणाच्या संपर्कात गेला तर त्याला पब्लिक तर मारेलच… घरात माझे वडील मारतील, माझी बायको मला नाश्ता द्यायची नाही, उलट ज्यांचा एखादा खासदार आहे, त्यांना शरद पवारांच्या संपर्कात येता येईल. यांच्यावर काय बोलायचं, असे सोनवणे यांनी म्हटले.
अमोल मिटकरी हे काही दिग्गज नाव नाही
अमोल मिटकरी हे काही दिग्गज नाव नाही. त्याने ट्वीट करावं आणि मी दखल घ्यावी… दखलपात्र माणसाची दखल घेतली जाते, असा टोलाही बजरंग सोनवणे यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.