शरद पवारांसोबत तुमचे बोलण काय झाले? – मराठा मावळा संघटना

मावळा संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सवाल

0

शरद पवारांसोबत तुमचे बोलण काय झाले?

मावळा संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सवाल

छत्रपती संभाजीनगर : येथील विमानतळावर मराठा मावळा संघटनेच्या वतीने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गोरगरीब मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊन सरकारने हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा, या प्रमुख मागणीसाठी तसेच शरद पवारांसोबत तुमचे बोलण काय झाले? असा प्रश्न विचारला. यावर आम्ही सर्वजण बसून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा देऊन मराठा मावळा पदाधिकाऱ्यानी जल्लोष केला.

मराठा संघटना मराठा आरक्षणासाठी विविध माध्यमातून मंत्र्यांना व विरोधी पक्षाच्या नेत्याना निवेदन देत जाब विचारात आहेत. त्यांनी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करावी, अन्यथा लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला जात आहे. दोन दिवसांपूर्वी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने मातोश्री समोर निदर्शने आंदोलन केले होते. तर मराठा मावळा संघटनेच्यावतीने शरद पवार थांबलेल्या हॉटेल बाहेर निदर्शने आंदोलन करीत मागणीचे निवेदन दिले.

मराठा समाजात तीव्र नाराजी

मुख्यमंत्री, शरद पवार, उद्धव ठाकरे, आदी नेत्यांनी मराठा समाजाचे निवेदन स्वीकारले मात्र भेटण्यासाठी आलेल्यांना गोलमाल उत्तरे देऊन त्यांची बोळवण केली आहे. यामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी असून त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत या सर्व पक्षांना भोगावे लागणार आहेत, असे मराठा समाजाकडून उघडपणे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.