बहुजनहृदयसम्राट ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या बीड जिल्ह्यातील सभेसाठी पूर्वनियोजित बैठक अंबाजोगाई येथे पार पडली

0 110

बहुजनहृदयसम्राट ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या बीड जिल्ह्यातील सभेसाठी पूर्वनियोजित बैठक अंबाजोगाई येथे पार पडली

अंबाजोगाई (धम्मापालसिंह कांबळे): वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय श्रध्देय बहुजनहृदयसम्राट ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची लढा वंचितांच्या सत्तेसाठी म्हणून ११ऑक्टोंबर रोजी सभा होणार आहे.त्या सभेची पूर्व तयारी बैठक वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष प्रा किशनराव चव्हाण सर, प्रदेश उपाध्यक्ष प्रा विष्णू जाधव सर, आणि मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.
या बैठकीचे रूपांतर सभेमध्ये झाले.सभेसाठी हजरो कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष शैलेश कांबळे, युवा जिल्हा अध्यक्ष बाबुराव मस्के,पारलिंगी समाज नेत्या नंदिनी ताई,भारत सातपुते, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, युवा महासचिव अक्षय भुंबे उपस्थित होते.
तर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी गोविंद मस्के, नितीन सरवदे, अमोल पौळे, धम्मपालसिंहराजे कांबळे, सम्राट हिरवे, सुशांत धावरे यांनी परिश्रम घेतले.

आदरणीय बाळासाहेबांची सभा ही वंचितांच्या सत्तेसाठी आहे,गायरानधारकांसाठी आहे, संविधान वाचविण्यासाठी आहे त्यामुळे बीड येथे होणार्या सभेसाठी लाखो लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.