केरळच्या कोझिकोड रूग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा – हातातील फ्रॅक्चरमध्ये चुकीचा रॉड टाकल्याने गुन्हा दाखल

0 19

केरळच्या कोझिकोड रूग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा
– हातातील फ्रॅक्चरमध्ये चुकीचा रॉड टाकल्याने गुन्हा दाखल

कोझिकोड : केरळमधील कोझिकोड येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात चुकीच्या आॅपरेशनचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयातील एका डॉक्टरला चुकीची शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. आता हातातील फ्रॅक्चरच्या उपचारादरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणामुळे हातात चुकीचा रॉड टाकण्यात आल्याची तक्रार एका रुग्णाने पोलिसांत दिली आहे.

कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे देशभरात मृत्यू झाल्याप्रकरणी याचिका दाखल – सर्वोच्च न्यायालयाने केंद्रसरकारला बजावली नोटीस नवी दिल्ली

नेपाळ सरकारकडून एमडीएच व एव्हरेस्ट मसाला विक्रीवर बंदी – मसाल्यांमध्ये कीटकनाशके आणि इथिलीन आॅक्साईडची शक्यता वर्तवण्यात आल्याने निर्णय
याविषयी मात्र रुग्णालयाने हे आरोप फेटाळून लावत रुग्णावर योग्य शस्त्रक्रिया झाल्याचे सांगितले. वैद्यकीय महाविद्यालय पोलीस ठाण्यातील एका अधिकाºयाने रविवारी सांगितले की, शनिवारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारातील अनियमिततेबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. २४ वर्षीय अजितच्या आईने आपल्या मुलाच्या हातावरील आॅपरेशनवरबद्दल सांगितले की, त्याच्या उजव्या हातात आणखी एका रुग्णाचा रॉड घातला गेला होता त्यामुळे त्याचा हात खूप दुखत होता. एका दिवसापूर्वी रस्ता अपघातानंतर त्यांना बीच हॉस्पिटलमधून येथे रेफर करण्यात आले होते.

कोव्हॅक्सिन’ लस घेतल्यांनानाही होऊ शकतात रक्ताच्या गुठळ्या! – ‘बीएचयू’ च्या संशोधनातील निष्कर्ष
पुन्हा शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांचा नकार
आॅपरेशननंतर वेदना वाढल्याने एक्स-रेमध्ये डॉक्टरांनी चुकीचा रॉड पेशंटमध्ये घातल्याचे उघड झाले. रुग्णाच्या नातेवाइकांनी सांगितले की, डॉक्टरांनी रुग्णावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यासाठी दबाव आणला आणि नकार दिल्यावर त्याने नातेवाईकांवर आरडाओरडाही केला. तक्रार नोंदवणाºया आईने सांगितले की, कुटुंबाने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ३,००० रुपयांच्या वैद्यकीय वस्तू खरेदी केल्या होत्या, त्यापैकी काहीही आॅपरेशनमध्ये वापरले गेले नाही.
बोटाऐवजी जिभेवर शस्त्रक्रिया केल्याने डॉक्टर निलंबित
रुग्णाच्या उपचारात कोणतीही चूक झाली नसल्याचे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या अस्थिव्यंग विभागाचे प्रमुख डॉ.जेकब मॅथ्यू यांनी सांगितले. त्यांना बसवलेला रॉड हा मानकानुसार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयातील एका डॉक्टरला चुकीची शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. चार वर्षांच्या मुलीच्या सहाव्या बोटावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी तिच्या जिभेवर शस्त्रक्रिया केली.
………………………………………………………….

Leave A Reply

Your email address will not be published.