कोव्हॅक्सिन’ लस घेतल्यांनानाही होऊ शकतात रक्ताच्या गुठळ्या! – ‘बीएचयू’ च्या  संशोधनातील निष्कर्ष 

0 273

‘कोव्हॅक्सिन’ लस घेतल्यांनानाही होऊ शकतात रक्ताच्या गुठळ्या!

– ‘बीएचयू’ च्या  संशोधनातील निष्कर्ष 

नवी दिल्ली : कोरोना लस अॅस्ट्रझेनिका या लस उत्पादक कंपनीने न्यायालयात लसीचे दुष्परिणाम असल्याची कबुली दिल्यानंतर सीरसने उत्पादीत केलेल्या कोव्हिशिल्ड लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याचे नुकतेच समोर आले होते. त्यातच भारत बायोटेकने उत्पादन केलेल्या कोव्हॅक्सिन लसीचेही दुष्परिणाम असल्याचे ‘बीएचयू’ च्या एका संशोधनातून समोर आल्याने लस घेतलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सावधान ! केरळमध्ये ‘वेस्ट नाईल’ तापाचा फैलाव – आरोग्य यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा

हे ईश्वर….. आपण शरीरात लस घेतली हे आपल दुर्देव – बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या प्रतिक्रीयेमुळे मोठी खळबळ

बीएचयू अर्थात बनारस हिंदू विद्यापीठात करण्यात आलेल्या एका अभ्यासात एक तृतीयांश लोकांमध्ये श्वसन मार्गाच्या संसर्गासह सर्दी, खोकला तापाची लक्षणे दिसली आहेत. कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जीचा त्रास असलेल्या लोकांमध्ये कोव्हॅक्सिनचे दुष्परिणाम अधिक असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय काही लोकांमध्ये स्ट्रोकचेही लक्षणे दिसून आली आहेत.

कोरोना लस उत्पादक कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाकडून जगभरातील लस विक्री थांबवण्याचा निर्णय – बाजारातून लस काढून टाकली जाणार असल्याची कंपनीकडून माहिती

लोकांच्या शरीरात गेलेली धोकादायक लस परत कशी घेणार? – देणगीच्या लालसेपोटी भाजपने करोडोंचा जीव धोक्यात टाकल्याचा अखिलेश यांचा आरोप

या अभ्यासात ४७.९% किशोरवयीन व ४२.२% प्रोढांमध्ये श्वसन मार्गाचे संक्रमण दिसल्याने त्यांच्यात सर्दी, खोकला यांसारख्या समस्या निर्माण झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय १०.५% किशोरवयीन मुलांमध्ये त्वचेची संबंधित आजार उद्भवल्याचे तर ४.७% लोकांना मज्जासंस्थेशी संबंधित आजार आणि १०.२% किशोरवयीन मुलांना सामान्य आजार जडले आहेत.

याशिवाय प्रोढांमध्ये सामान्य विकार ८.९% तर स्नायू आणि हाडांचे विकार ५.८% तसेच मज्जासंस्थेचे विकार ५.५% लोकांना जडल्याचे या अभ्यासातून उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

कोरोना लसीमुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी घेण्यास केंद्र सरकारचा नकार – केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारने झटकले हात

Leave A Reply

Your email address will not be published.