लोकांच्या शरीरात गेलेली धोकादायक लस परत कशी घेणार? – देणगीच्या लालसेपोटी भाजपने करोडोंचा जीव धोक्यात टाकल्याचा अखिलेश यांचा आरोप

0 280

लोकांच्या शरीरात गेलेली धोकादायक लस परत कशी घेणार?
– देणगीच्या लालसेपोटी भाजपने करोडोंचा जीव धोक्यात टाकल्याचा अखिलेश यांचा आरोप

लखनऊ : लसीच्या दुष्परिणामुळे मृत्यू झाल्यास त्याची जिम्मेदारी केंद्र सरकारची नाही, असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वाेच्च न्यायालयात सादर केले होते. यानंतर लसीचे दुष्परिणाम असल्याची अनेक प्रकरणे समोर येताना दिसत असतानाच अ‍ॅस्टाजेनिका या कंपनीने न्यायालयात लस घेतलेल्या नागरिकांना ह्दयविकारचा झटका येऊ शकतो अशी कबूली दिल्यानंतर जगभरात भितीचे वातावरण तयार झाले. कोरोना लसीबाबत अखिलेश यांनी शरीरात गेलेली धोकादायक लस त्यांच्याकडून परत कशी घेणार? असा सवाल करीत भाजपला धारेवर धरले.

लस प्रमाणपत्रावरून मोदींची एक्झीट? – कोविशील्ड लसीबाबत वाद सुरू असताना मोदींच्या छायाचित्राबाबत चर्चा

कोरोना लसीमुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी घेण्यास केंद्र सरकारचा नकार – केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारने झटकले हात
यावेळी अखिलेश यादव यांनी गुरुवारी ट्िवटरवर लिहिले, कोरोना लस बनवणारी कंपनी अतिरिक्त पुरवठ्यांच्या बहाण्याने बाजारातून आपली प्राणघातक लस काढून घेत आहे. संतप्त जनता भाजप सरकारला विचारत आहे की ज्यांच्या शरीरात ही धोकादायक लस पोहोचली आहे त्यांच्याकडून ते परत कसे येणार? कोटयावधींच्या देणगीच्या लालसेपोटी भाजपने करोडोंचा जीव धोक्यात टाकला आहे. आपल्याच देशवासीयांचा जीव धोक्यात घालून भाजप जनविरोधी पक्ष बनला आहे.

लसीच्या माध्यमातून शरिरामध्ये जे घेतले ते आपलं दुर्भाग्य आहे – अभिनेता श्रेयश तळपदे यांचे खळबळजनक वक्तव्य

Leave A Reply

Your email address will not be published.