कोरोना लस उत्पादक कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाकडून जगभरातील लस विक्री थांबवण्याचा निर्णय – बाजारातून लस काढून टाकली जाणार असल्याची कंपनीकडून माहिती

0 262

कोरोना लस उत्पादक कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाकडून जगभरातील लस विक्री थांबवण्याचा निर्णय
– बाजारातून लस काढून टाकली जाणार असल्याची कंपनीकडून माहिती

नवी दिल्ली : ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी अ‍ॅस्ट्राझेनेकाने जगभरात आपली कोविड १९ लस खरेदी आणि विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही लस तयार केली जात नाही आणि पुरवली जात नाही. लस बंद करण्याचा निर्णय आणि त्याच्याशी संबंधित दुष्परिणामांचा संबंध नसल्याचा दावा अ‍ॅस्ट्राझेनेकाने केला आहे. व्यावसायिक कारणांमुळे ही लस बाजारातून काढून टाकली जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे, असे वृत्त द टेलिग्राफने दिले आहे.
कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा धोका
खरं तर, अ‍ॅस्ट्राझेनेकाने फेब्रुवारीमध्ये ब्रिटिश उच्च न्यायालयात सांगितले की त्यांच्या कोविड १९ लसीचे धोकादायक दुष्परिणाम होऊ शकतात. कंपनीने कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या कोरोना लसीमुळे थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम म्हणजेच टीटीएस होऊ शकतो. या आजारामुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेट्सची संख्या कमी होते. तथापि, हे अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्येच घडते. अ‍ॅस्ट्राझेनेकावर त्यांच्या लसीमुळे अनेक मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
कंपनीकडे सध्या या लसीमध्ये हा आजार कशामुळे होतो याची माहिती उपलब्ध नाही. ही कागदपत्रे समोर आल्यानंतर स्कॉटच्या वकिलाने न्यायालयात दावा केला आहे की अ‍ॅस्ट्राझेनेका-आॅक्सफर्ड लसीमध्ये त्रुटी आहेत आणि तिच्या प्रभावितेबद्दल चुकीची माहिती देण्यात आली होती.

लोकांच्या शरीरात गेलेली धोकादायक लस परत कशी घेणार? – देणगीच्या लालसेपोटी भाजपने करोडोंचा जीव धोक्यात टाकल्याचा अखिलेश यांचा आरोप

लस प्रमाणपत्रावरून मोदींची एक्झीट? – कोविशील्ड लसीबाबत वाद सुरू असताना मोदींच्या छायाचित्राबाबत चर्चा
कंपनीविरूध्द ५१ खटले प्रलंबित
इतर अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागले. कंपनीविरुद्ध उच्च न्यायालयात ५१ खटले प्रलंबित आहेत. पीडितांनी अ‍ॅस्ट्राझेनकाकडून सुमारे 1 हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
कंपनीने प्रथम दावे नाकारले, नंतर स्वीकारले
गेल्या वर्षी स्कॉटने अ‍ॅस्ट्राझेनेकाविरोधात तक्रार दाखल केली होती. मे २०२३ मध्ये स्कॉट यांच्या आरोपांना प्रतिसाद म्हणून कंपनीने दावा केला की त्यांच्या लसीमुळे होऊ शकत नाही. मात्र, या वर्षी फेब्रुवारीमध्ये हायकोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कंपनीने हा दावा मागे घेतला. या कागदपत्रांची माहिती आता समोर आली आहे.
ब्रिटिश नागरिक जेमी स्कॉट यांनी दाखल केला पहिला खटला
एप्रिल २०२१ मध्ये जेमी स्कॉट नावाच्या व्यक्तीला ही लस मिळाली. यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याचा थेट परिणाम त्याच्या मेंदूवर झाला. याशिवाय स्कॉटच्या मेंदूमध्ये अंतर्गत रक्तस्रावही झाला. अहवालानुसार, डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीला सांगितले की ते स्कॉटला वाचवू शकणार नाहीत.

कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप – कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत लस उत्पादक कंपनीकडून कबुली

कोरोना लसीमुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी घेण्यास केंद्र सरकारचा नकार – केंद्रातील आरएसएस-भाजपा सरकारने झटकले हात
लस बाजारात आणल्यानंतर काही महिन्यांतच लसीचे धोके
विशेष म्हणजे ही लस आता ब्रिटनमध्ये वापरली जाणार नाही. टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, शास्त्रज्ञांना ही लस बाजारात आणल्यानंतर काही महिन्यांनी त्याचा धोका लक्षात आला होता. यानंतर, ४० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनाही इतर काही लसींचा डोस द्यावा, असे सुचवण्यात आले. कारण अ‍ॅ​​​​​​​स्ट्राझेनेका लसीमुळे होणारी हानी कोरोनाच्या धोक्यापेक्षा जास्त होती.
रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे लोकांचा मृत्यू
मेडिसिन्स हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी नुसार, ब्रिटनमध्ये ८१ प्रकरणे आहेत ज्यात लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. दुष्परिणाम झालेल्या पाचपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. माहितीच्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, सरकारने फेब्रुवारीमध्ये ब्रिटनमध्ये १६३ लोकांना नुकसानभरपाई दिली होती. यापैकी १५८ जणांना अ‍ॅस्ट्राझेनेका लस मिळाली होती.

कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांना तात्काळ भरपाई द्या – न्यायालयाने केंद्रसरकारला निर्देश द्यावेत याचिकेद्वारे मागणी

Leave A Reply

Your email address will not be published.