कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांना तात्काळ भरपाई द्या – न्यायालयाने केंद्रसरकारला निर्देश द्यावेत याचिकेद्वारे मागणी

लस घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होत असल्याचे लस उत्पादन करणाºया अ‍ॅस्ट्राझेनेका या ब्रिटनमधील औषध कंपनीने कबुली दिली आहे.

0 464

कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांना तात्काळ भरपाई द्या
– न्यायालयाने केंद्रसरकारला निर्देश द्यावेत याचिकेद्वारे मागणी

नवी दिल्ली : कोरोना लस घेतल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होत असल्याचे लस उत्पादन करणाºया अ‍ॅस्ट्राझेनेका या ब्रिटनमधील औषध कंपनीने कबुली दिली आहे. कोरोना काळात कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर गंभीर अपंगत्व आलेल्या किंवा मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना नुकसानभरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात बुधवारी दाखल झाली.

लस पुर्णपणे सुरक्षीत असल्याचा पुनावालांचा खोटा दावा ? नागपूर खंडपीठाची अदर पूनावालांना नोटीस

कोरोना लसीने कायमस्वरूपी मेंदूचं नुकसान झाल्याचा नागरिकांकडून आरोप – कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत लस उत्पादक कंपनीकडून कबुली

कोरोनात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या औषधामुळे १७ हजार जणांचा मृत्यू – मलेरियाचे औषध आहे कोरोना बाधितांना दिल्याने मृत्यू झाल्याचे संशोधनातून समोर
कोव्हिड – १९ प्रतिबंधासाठी विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड लशीमुळे रक्तातील प्लेटलेट्स कमी होण्याबरोबरच (थ्रोम्बोसायटोपेनिया सिन्ड्रोम) रक्तात गुठळ्या तयार होण्याचा प्रकार (थ्रोम्बोसिस) काही अत्यंत दुर्मीळ रुग्णांच्या बाबतीत घडू शकतो, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेका या ब्रिटनमधील औषध कंपनीने दिली आहे. त्या अनुषंगाने वकील विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. कोव्हिशिल्डची जोखीम आणि संभाव्य दुष्परिणामांची तपासणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय तज्ज्ञांची समिती स्थापण्याची मागणीही याचिकादाराने केली आहे.

बर्ड फ्लू नवीन साथीचे कारण बनू शकतो – रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचा इशारा

कोव्हिड लसीमुळे अनेकांना शुगर, बीपीचा त्रास, त्यामुळे मी लस घेतली नाही – आमदार प्रणिती शिंदे यांचेकडून लस न घेतल्याची कबूली
प्लेटलेटस घटणे किंवा रक्तात गुठळ्या हे धोके आणि लस यांचा संबंध असल्याचे अ‍ॅस्ट्राझेनेकाने मान्य केल्याचा दावा याचिकेत केला आहे. भारतात या लशीची निर्मिती पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने केली होती आणि तिच्या १७५ कोटी मात्रा देण्यात आल्या होत्या, असे याचिकेत म्हटले आहे. कोव्हिशिल्डच्या संभाव्य दुष्परिणांबाबत अ‍ॅस्ट्राझेनेक कबुली दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत नागरिकांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

फायझरच्या कोरोना लसीमध्ये कर्करोग निर्माण करणारा डीएनए – डीएनएमध्ये कर्करोग होण्याची क्षमता असल्याची शास्त्रज्ञांमध्येही चर्चा

लसीकरणानंतर जर्मनीमध्ये जन्मदरात मोठी घट – कोविड लसीकरणानंतर ९ महिन्यात आलेला रिपोर्ट
लशीची निर्मिती पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने केली
अ‍ॅस्ट्राझेनेकाने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड या लशीची निर्मिती भारतात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने केली होती. या लशीच्या देशात १७५ कोटी मात्रा देण्यात आल्या होत्या आदी मुद्दयांचाही उल्लेख या याचिकेत करण्यात आला होता.
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूच्या संख्येत वाढ
कोरोना साथीनंतर हृदयविकाराच्या झटक्याने होणाºया मृत्यूच्या संख्येत वाढ. लस घेतल्यानंतर हृदयविकाराचा झटका आलेल्यांच्या संख्येत वाढ झाली, त्यांत तरुणांचाही समावेश. कोव्हिशिल्ड विकसित करणाºया कंपनीकडूनच ब्रिटनच्या न्यायालयात लशीच्या धोक्याबाबतचे पुरावे दाखल. देशातील नागरिकांनी ही लस घेतल्याने जोखीम आणि संभाव्य धोक्यांबाबत विचार करणे अत्यावश्यक. ही लस घेतलेल्या नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे.

पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या निम्म्यावर ‘ह्युमन रिप्राॅडक्शन अपडेट’ जर्नलमध्ये धक्कादायक खुलासा

कसोटीपटू शेन वाॅर्नचा कोविड लसीमुळे मृत्यू ह्दयरोगतज्ज्ञ डाॅ. असीम मल्होत्रा

Leave A Reply

Your email address will not be published.