कसोटीपटू शेन वाॅर्नचा कोविड लसीमुळे मृत्यू ह्दयरोगतज्ज्ञ डाॅ. असीम मल्होत्रा

0 1,019

कसोटीपटू शेन वाॅर्नचा कोविड लसीमुळे मृत्यू ह्दयरोगतज्ज्ञ डाॅ. असीम मल्होत्रा

 

नवी दिल्ली : कोरोना लसीमुळे ह्दयरोगाचा झटका येऊन मृत्यू होण्याचा संख्येत वाढ झाली आहे असं अनेक डॉक्टर संशय व्यक्त करत आहेत. त्यात आॅस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू व जगविख्यात फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचा वयाच्या ५२ व्या वर्षी अकस्मात मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. हृदयविकाराच्या झटक्याने शेन वार्नचा मृत्यू झाल्याचे कारण त्यावेळी सांगण्यात आले, पण भारतीय वंशाचे ह्दयरोगतज्ज्ञ डॉ. असीम मल्होत्रा आणि आॅस्ट्रेलियाचे डॉ. ख्रिस निल यांनी शेन वाॅर्नच्या मृत्यूचे कारण वेगळेच दिले आहे. डॉ. ख्रिस निल हे आॅस्ट्रेलियन वैद्यकीय व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. या दोघांच्या मते शेन वार्नने नऊ महिन्यांपूर्वी कोविड एमआरएनए लस टोचून घेतली होती. त्यामुळेच शेन वार्नचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता त्यांना वाटते.

शेन वार्नच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन चाचणी घेण्यात आली. यातून असे निदर्शनास आले की, शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराने झाला. या दोन डाॅक्टर्सनी केलेल्या संशोधनाच्या आधारे असे आढळून आले की, ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, पण तो सुरूवातीस निदर्शनास आला नसेल अशा व्यक्तीनी जर कोविड एमआरएनए लसीचा डोस घेतला तर त्याचा हृदयरोग त्वरित बळावतो.

डाॅ. असीम मल्होत्रांनी कसोटीपटू शेन वॉर्नचा आकस्मिक निधनाबद्दल म्हटले, वयाच्या ५२ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेन वॉर्नसारख्या एका माजी कसोटीपटूला अशा पद्धतीने अकस्मात मृत्यू येणे ही केवळ असामान्य बाब आहे. आम्हाला कल्पना होती की, शेन वॉर्नची जीवनशैली काहीशी आरोग्याला बाधक अशी होती. त्याचे वजन जास्त होते आणि तो अतिप्रमाणात धुम्रपान करत असे. डॉ. असीम मल्होत्रांनी आपले रुग्ण आणि वडीलांच्या मृत्यूचा संदर्भ देत म्हटले, या व्यक्तींनी एमआरएनए कोविडचे दोन डोस घेतल्यावर त्यांच्या धमन्यांना काहीशी सूज आली असावी आणि त्यामुळेच त्यांचे मृत्यू घडून आले.

मृत्यूचे कोवीड लस हे एक कारण

कोवीड लस घेतल्यानंतर हृदयाला पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवर त्याचा परिणाम होऊन जळजळ निर्माण होते आणि त्याचा त्रास काही महिने होऊ शकतो. यामुळे हृदयविकाराने आॅस्ट्रेलियासह जगभरात झालेल्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे आणि यामध्ये कोविड लस हे एक मुख्य कारण आहे असे वाटते अस डाॅ. असीम मल्होत्रा यांनी सांगितले. तर डाॅ. ख्रिस निल यांनी म्हटले की, सर्व पुरावे तपासून पाहील्यावर असा निष्कर्ष निघतो की, कोविड लसीमुळे रक्तवाहिन्यांना होणा-या जळजळीपेक्षा अधिक प्रमाणात परिणाम होऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.