मानकेश्वर येथिल बुद्ध मूर्ती व शिलालेखाचे जतन करावे बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

0 128

मानकेश्वर येथिल बुद्ध मूर्ती व शिलालेखाचे जतन करावे बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

 

परभणी : जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असणा-या मानकेश्वर या गावी पुरातन पाझर तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू असताना प्राचीन कोरीव काम असलेले शिलालेख स्तंभ आणि बुद्ध मूर्तीचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. या बुद्धकालीन शिलालेख यांचे पुरातत्व विभागामार्फत संशोधन करून प्राचीन ठेवाचे जतन करावे. याकडे प्रशासनाने गांभिर्याने दखल घावी अन्यथा बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क व इतर सहयोगी बौध्द संघटना व बहुजन संघटनांच्या माध्यमातून तिव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. या मागणीचे निवेदन दि. २० जुन २०२३ वार मंगळवार रोजी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनव्दारे करण्यात आले.

या निवेदनावर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क जिल्हाध्यक्ष रेखाताई ढगे, लखन चव्हाण, सुभाष साडेगावकर, बी एन बनसोडे, डॉ. बाळासाहेब लंगोटे नवनाथ अवचार, राजीव गांधारे, रघुनाथ वाकळे, विलास पंडित, माणिक घनसावंत, भगवान ढगे याच्यासह आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.